सिलिंडर चार रुपयांनी महागले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नागपूर - सिलिंडरच्या सबसिडीत कपात करण्यात आल्याने घरगुती वापराचे सिलिंडर चार रुपयांनी आणि व्यावसायिक ९३ रुपयांनी पुन्हा महागले आहेत. यास अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने निषेध नोंदवून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. केंद्र शासनाने सिलिंडरवरची सबसिडी टप्प्याटप्याने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर महिन्यात कपात केली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात चार रुपयांची कपात केल्याने ग्राहकांना आता चार  रुपये सिलिंडरसाठी जादाचे मोजावे लागणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल ९३ रुपयांनी वाढ होणार आहे. यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ, भोजनही महागणार आहे.

नागपूर - सिलिंडरच्या सबसिडीत कपात करण्यात आल्याने घरगुती वापराचे सिलिंडर चार रुपयांनी आणि व्यावसायिक ९३ रुपयांनी पुन्हा महागले आहेत. यास अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने निषेध नोंदवून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. केंद्र शासनाने सिलिंडरवरची सबसिडी टप्प्याटप्याने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर महिन्यात कपात केली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात चार रुपयांची कपात केल्याने ग्राहकांना आता चार  रुपये सिलिंडरसाठी जादाचे मोजावे लागणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल ९३ रुपयांनी वाढ होणार आहे. यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ, भोजनही महागणार आहे. ही दरवाढ सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी आहे. महागाईत भर टाकणारी असल्याचे सांगून ती त्वरित मागे घ्यावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्यावतीने महासचिव देवेंद्र तिवारी यांनी केली आहे.

टॅग्स