जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जिल्हा नियोजन समितीवर २५ सदस्य पाठविण्यासाठी निवडणूक जाहीर झाली. यासाठी २८ नोव्हेंबरला मतदान घेण्यात येईल आणि २९ ला मतमोजणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जिल्हा नियोजन समितीवर २५ सदस्य पाठविण्यासाठी निवडणूक जाहीर झाली. यासाठी २८ नोव्हेंबरला मतदान घेण्यात येईल आणि २९ ला मतमोजणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतीतून जिल्हा नियोजन समितीवर २५ सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून पाठविले जातात. जिल्ह्यातील मोठे नागरी, लहान नागरी व संक्रमणात्मक मतदारसंघातील इच्छुकांना नामनिर्देशन पत्र १ ते ७ नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक  सुटीचे दिवस वगळून जिल्हा नियोजन समिती निवडणूक, नागपूर यांचे कार्यालयात सकाळी ११  ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील. नामनिर्देशन पत्राची छाननी गुरुवारी (ता. ९) सकाळी १० वाजतापासून केली जाईल. उमेदवारी अर्ज सोमवारी (ता. २०) दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येईल.

एकापेक्षा जास्त दावेदार असल्यास मंगळवारी (ता. २८) सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी २९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केली जाईल. ती आटोपल्यानंतर लगेच निकाल घोषित करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी मिलिंदकुमार साळवे यांची नियुक्त केली असून, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी शिरीष पांडे, तसेच भूसंपादन उपजिल्हाधिकारी आर. बी. खंजाजी काम पाहणार आहे.

जागांची आकडेवारी
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडणुकीसाठी मोठे नागरी निर्वाचन क्षेत्रात अनुसूचित जातीसाठी २, अनुसूचित जाती महिलांसाठी २, अनुसूचित जमातीसाठी १, अनुसूचित जमाती महिलांसाठी १, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी ३, नामाप्र महिलांसाठी ३, सर्वसाधारण ४, सर्वसाधारण महिला ४ अशा २० जागांचा समावेश आहे. लहान नागरी निर्वाचन क्षेत्रात अनुसूचित जातीसाठी १, नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी महिला १, सर्वसाधारण १ व सर्वसाधारण महिला १ अशा ४ जागा असून, संक्रमणात्मक निर्वाचन क्षेत्रात सर्वसाधारण गटात १ जागेसाठी मतदान घेण्यात येणार आहे.

Web Title: nagpur news election