कर्मचाऱ्याने लाटली कृषी साहित्याची रक्कम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नागपूर - शासनामार्फत शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे अनुदानावर वाटप करण्यात येते. यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना १० टक्के रक्‍कम द्यावी लागते. ही रक्कम शासनाकडे जमा न करता कर्मचाऱ्याने परस्पर लाटल्याचा प्रकार भिवापूर पंचायत समितीत समोर आला आहे. या प्रकरणी कृषी विस्तार अधिकारी एन. लिंगमवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

विस्तार अधिकाऱ्याने १ लाख ३८ हजार रुपयांपैकी ७५ हजार रुपये जमा केल्याची माहिती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. गजबे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.  

शेतकऱ्यांना ताडपत्री, स्प्रे पंप, ट्रे यासह विविध साहित्यांचे अनुदानावर वाटप करण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी साहित्यासाठीच्या रकमेपैकी १० टक्के रक्कम द्यावी लागते. ही रक्कम महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलमेंट कॉर्पोरेशनकडे (एमएआयडीसी) जमा करण्यात येते. मात्र,  एन. लिंगमवार यांनी ही १० टक्के रक्कम स्वतःकडे परस्पर ठेवून घेतली. बी. गजबे यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लिंगमवार यांना रक्कम जमा करण्याचे पत्र दिले. 

गजबे यांनी सांगितले, वर्ष २०१६-१७ साठी ११ लाभार्थ्यांची निवड झाली होती. या लाभार्थ्यांकडून जमा झालेली रक्कम लिंगमवार यांनी आपल्याकडे ठेवली होती. 

वरिष्ठांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न!
तत्कालीन विस्तार अधिकारी बारापात्रेही या प्रकरणी गोत्यात येण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणाची वाच्यता कुठेही होणार नाही, याची खबरदारी वरिष्ठांकडून घेण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाचे ‘लिंक’ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.