वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

उंबर्डाबाजार (जि. वाशीम) - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दुधोरा येथील शेतकरी वामनराव भगवान ढोकणे (वय 79) यांनी रविवारी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

उंबर्डाबाजार (जि. वाशीम) - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दुधोरा येथील शेतकरी वामनराव भगवान ढोकणे (वय 79) यांनी रविवारी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

वामनराव भगावन ढोकणे यांच्याकडे चार एकर शेती आहे. गेल्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे ते कर्जबाजारी झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मागील काही दिवसांपासून ते निराश होते. शेतातील झाडाला गळफास लावून आज त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.