मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील पाच जणांना अटक 

मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील पाच जणांना अटक 

नागपूर - जरीपटक्‍यातील मणप्पुरम गोल्ड बॅंकेवर भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा घालून तब्बल 31 किलो सोन्यासह 10 कोटींचा ऐवज लुटून नेणाऱ्या कुख्यात दरोडेखोर सुबोध सिंह आणि त्याच्या पाच साथीदारांना बिहारमध्ये अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 किलो सोने पोलिसांनी जप्त केले. त्याच्या काही साथीदारांना बिहार पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. 

जरीपटक्‍यातील मुख्य सिमेंट रोडवरील भीमचौकात मणप्पुरम गोल्ड लोनचे पॉश कार्यालय आहे. 28 सप्टेंबर 2016 ला दुपारी चार वाजता अचानक सहा जण हातात पिस्तूल घेऊन बॅंकेत पोहोचले. दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना आरडाओरडा केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. सर्वांना हात वर करून उभे राहण्यास सांगितले. शाखेचा व्यवस्थापक, चार कर्मचारी व महिलेसह पाच ग्राहकांना दरोडेखोरांनी बंधक बनवले. त्यानंतर दरोडेखोरांपैकी चौघांनी कार्यालयातील लॉकरमधील अगदी 18 मिनिटांत दरोडेखोरांनी जवळपास 31 किलो सोन्याचे दागिने आणि काउंटरमध्ये ठेवलेली तीन लाख रुपयांची रकम घेऊन पोबारा केला होता. विशेष म्हणजे सर्व दरोडेखोर दुचाकीवरून आले होते. दरोडेखोर पळून जाताच बॅंक व्यवस्थापकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. जरीपटका पोलिसांना घटनास्थळावर पोहोचायला उशीर झाल्याने दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत. जवळपास एक वर्षभर पोलिसांना दरोडेखोरांचा पत्ता लागला नाही. मात्र, शेवटी बिहार पोलिसांच्या माहितीवरून सुबोधसिंहने दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे सहनिरीक्षक ज्ञानेश्‍वर भेदोडकर यांचे पथक सुबोधसिंहाच्या घरावर जवळपास महिनाभर वॉच ठेवून होते. त्यांनी दरोडेखोर सुबोध सिंहाच्या पत्नीला सहआरोपी म्हणून अटक केली होती. ती नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. लाखोंचे बक्षीस असलेल्या सुबोध सिंहाला बिहार स्पेशल टास्क फोर्स टीमने अटक केली. 

देशातून 120 किलो सोन्याची लूट 
सुबोध सिंह हा बिहारमधील कुख्यात दरोडेखोर आहे. त्याने बिहार जेलमधून सुटल्यानंतर साथिदारांसह थेट महाराष्ट्र गाठले. नागपुरातील जरीपटक्‍यातील मणप्पुरम बॅंकेवर दरोडा टाकण्याचे नियोजन आखले आणि ते यशस्वीसुद्धा केले. सुबोध सिंहने आतापर्यंत फक्‍त मणप्पुरम गोल्ड लोन बॅंकांवरच दरोडे टाकले आहेत. देशभरातून त्याने 120 किलो सोने लुटून नेले, हे विशेष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com