गीतकार मुकुंद पुल्लीवार विदर्भाचे ग. दि. माडगुळकर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

नागपूर - कविता आणि गाण्यांच्या माध्यमातून वैदर्भी रसिकांना समृद्ध करणारे गीतकार मुकुंद पुल्लीवार विदर्भाचे ग. दि. माडगूळकर आहेत, ही विद्यावाचस्पती स्व. प्राचार्य राम शेवाळकर यांनी दिलेली पावती अतिशय योग्य असल्याचे मत व्यक्त करतानाच पाच दशकांचा हा प्रवास अनेकांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्‌गार वक्‍त्यांनी काढले. निमित्त होते मुकुंद पुल्लीवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याचे.

नागपूर - कविता आणि गाण्यांच्या माध्यमातून वैदर्भी रसिकांना समृद्ध करणारे गीतकार मुकुंद पुल्लीवार विदर्भाचे ग. दि. माडगूळकर आहेत, ही विद्यावाचस्पती स्व. प्राचार्य राम शेवाळकर यांनी दिलेली पावती अतिशय योग्य असल्याचे मत व्यक्त करतानाच पाच दशकांचा हा प्रवास अनेकांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्‌गार वक्‍त्यांनी काढले. निमित्त होते मुकुंद पुल्लीवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याचे.

स्वरसाधना, धडपड मंच आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी-गीतकार मुकुंद पुल्लीवार यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा शंकरनगर येथील साई सभागृहात घेण्यात आला. या वेळी शोभा मुकुंद पुल्लीवार, शिवकथाकार विजयराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ कवी प्रा. सुरेश देशपांडे, वनराईचे विश्‍वस्त गिरीश गांधी, माजी खासदार दत्ता मेघे, नारायण जोशी, मोहन नाहातकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विजयराव देशमुख म्हणाले, ‘भय्याजी  सामक, श्‍याम देशपांडे आणि मुकुंद पुल्लीवार ही त्रयी विदर्भाचे सांस्कृतिक विश्‍व अनेकवर्षे गाजवत आली आहे. मुकुंद पुल्लीवार यांच्या रसाळ, प्रासादिक, सुगम तसेच गेय रचना मला वाचायला, ऐकायला मिळाल्या. त्यांचे बहुतांश कवितासंग्रह मी वाचून काढले आहेत. मुकुंदरावांसारखी विदर्भातील प्रतिभावान माणसं प्रसिद्धीपासून लांब राहतात. ती का राहतात, मला माहिती नाही. पण, निष्ठेच्या जागी प्रसिद्धीसारख्या गोष्टींना महत्त्व नसतं.’ गिरीश गांधी यांनीदेखील पुल्लीवार यांच्या योगदानाचा गौरव करीत स्व. प्राचार्य राम शेवाळकर यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. तसेच दुर्लक्षित राहिलेल्या वैदर्भी कला क्षेत्राचे सांस्कृतिक-साहित्यिक संचित काय आहे, याचा विचार करावा लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.  

भक्तिसंगम...
सत्कार सोहळ्यानंतर मुकुंद पुल्लीवार यांनी रचलेल्या गीतांचा ‘भक्तिसंगम’ कार्यक्रम झाला. अनिल खोब्रागडे, श्‍याम देशपांडे, छाया वानखेडे-गजभिये, यामिनी पायघन, विनोद वखरे यांनी गाणी सादर केली. जनार्दन लाडसे आणि दीपक फडणवीस यांनी तबल्यावर साथ केली. तर सुधीर गोसावी यांनी व्हायोलिन आणि श्रीकांत पिसे यांनी की-बोर्डवर साथ केली. निवेदन स्मिता खनगई आणि प्रा. विवेक अलोणी यांनी केले.

टॅग्स

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

04.06 PM

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

04.06 PM

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

04.06 PM