गुप्ता कोल इंडियाला दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नागपूर - विविध बॅंकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यात अपयशी ठरलेल्या गुप्ता कोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला मंगळवारी (ता. ६) कर्जवसुली न्याय प्राधिकरणाने दणका दिला. कंपनीने घेतलेले कर्ज परत घेण्यासाठी बॅंकांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधिकरणाने कंपनीचे संचालक पद्मेश गुप्ता, पीयूष मरोडिया आणि अनुराधा गुप्ता यांना  परदेशात जाण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असल्याचे निर्देश दिले. 

गुप्ता कोल इंडिया प्रा. लिमिटेडने बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय बॅंक, अलाहाबाद बॅंक, विजया बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक यांच्याकडून २ हजार ७४७.२५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज फेडण्यात कंपनीला अपयश आल्याने बॅंकांनी त्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू केली.  याअंतर्गत सर्व बॅंकांनी कर्जवसुली न्याय प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली. यात कंपनीने घेतलेले कर्ज फेडण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच याचिकेसोबत एक अर्ज जोडण्यात आला. त्यात कंपनीच्या संचालकांना विदेशात जाण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यात आली. बॅंकांनी केलेल्या अर्जावरील सुनावणीदरम्यान कंपनीच्या तीन संचालकांना न्यायाधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय भारताबाहेर जाता येणार नाही. तसेच न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार या तिन्ही संचालकांचे पारपत्र वेळोवेळी तपासण्यात येणार आहे. बॅंकांतर्फे ॲड. अवधूत पुरोहित यांनी बाजू मांडली.