नागपूरः पत्नीच्या प्रियकरानं केली पतीची हत्या; आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नागपूरः अनैतिक संबंधातून 45 वर्षीय मनोज लोणकर या व्यक्‍तीची हत्या झाल्याची घटना घडली. या प्रकरणी इशांत मुनघाटे या आरोपीला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दहा तासात अटक केली.

मृत मनोज आणि त्याची पत्नी सोनू लोणकर यांच्यात नेहमी भांडणे होत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सोनू मनोजला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहत होती. दरम्यान, तिचे आरोपी इशांत मुनघाटे याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. मनोज आणि इशांत हे मित्र आहेत. मनोजला या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली होती. त्यामुळे रविवारी (ता. 16) तो पत्नी सोनू हिच्याकडे आला. यावेळी दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले.

दरम्यान, दोघांच्या भांडणाची माहिती प्रियकर इशांतला मिळाली आणि मनोज प्रेमात अडसर ठरत असल्याने त्यानं त्याचा काटा काढण्याचं ठरवले. रात्री मनोज राजकमल चौकात बसला असताना इशांत तिथं आला आणि त्याच्या डोक्‍यात सिमेंटचा दगड मारला. यात मनोजचा जागीच मृत्यु झाला. पोलिसांनी अवघ्या दहा तासात या प्रकरणाचा छडा लावत आरोपी इशांतला अटक केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: