भारतातही महिलांचेही आयपीएल व्हावे: मोना मेश्राम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

नागपूर: ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळणाऱ्या हरमनप्रीत व स्मृती मंधानाच्या अनुभवाचा महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत संघाला खुप फायदा मिळाला. त्यामुळे भारतातही महिलांचे आयपीएल व्हावे, अशी इच्छा विश्‍वकरंडकात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोना मेश्रामने व्यक्‍त केली.

स्पोर्टस जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन) तर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ती बोलत होती. विश्‍वकरंडकातील सामन्यांचे टिव्हीवर प्रथमच थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने घराघरात महिला क्रिकेट पोहोचले आहे. विशेषत: युवा मुलींमध्ये क्रिकेटबद्‌दल आकर्षण वाढू लागले आहे. त्यामुळे पालक मुलींना क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी इच्छूक आहेत. परिणामत: भारतीय क्रिकेटला "अच्छे दिन' येतील, असा विश्‍वासही तिने यावेळी व्यक्‍त केला.

"होमग्राऊंड'वर खेळणाऱ्या यजमान इंग्लंडविरूद्‌धच्या अंतिम सामन्यात अनुभव कमी पडल्याचेही तिने एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: