प्रेयसीसह स्वत:वर चाकूहल्ला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नागपूर - फेसबुक फ्रेंडशिप एका युवतीला चांगलीच महागात पडली. तिच्या फेसबुकवरील मित्राने फिरायला न आल्यामुळे प्रेयसीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करीत चाकूहल्ला केला. प्रेयसीच्या अंगातून रक्‍त वाहत असल्याचे पाहून प्रियकराने स्वतःवरही चाकूहल्ला करीत जखमी करून घेतले. हा प्रकार रामबाग परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. इमामवाडा पोलिसांनी आरोपी प्रियकर दीपक विमल अग्रवाल (19, रा. एमआयजी कॉलोनी, रामबाग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. 

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित 19 वर्षीय मोहिनी (बदललेले नाव) ही जरीपटक्‍यातील समतानगरात राहते. ती इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. आरोपी दीपकचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. तो वडिलांना दुकानात मदत करतो. दोघांची फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. मात्र, काही दिवसांपासून दीपक व मोहिनीमध्ये छोट्या-मोठ्या कारणांनी वाद होऊ लागला. दरम्यान, त्या दोघांनी एकमेकांशी नातेही तोडले. मात्र, पुन्हा ते प्रेमात पडले. मंगळवारी दीपक व मोहिनी बाहेर फिरण्यास गेले. सायंकाळी साडेसहाला दीपक तिला घेऊन घरी आला. दरम्यान, दोघांत वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या दीपकने मोहिनीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली व घरातील चाकूने तिच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने तिच्या जखमेतून रक्‍त वाहायला लागले. प्रेयसी रडत असल्याचे पाहून दीपकने स्वतःलाही चाकूने जखमी केले. 

Web Title: nagpur news knife attack on yourself