‘त्या’ जखमी मजुराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नागपूर - निर्माणाधीन हॉस्पिटलची संरक्षण भिंत पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नऊपैकी एका मजुराचा मृत्यू झाला. दिनेश नामदेव पेंटर (वय ४०, रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे. चौघांची अजूनही प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

वर्धा मार्गावरील विवेकानंद नगरात स्पेक्‍ट्रम हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेला भूखंड महालक्ष्मी रियालिटीजची असून, याचे संचालक डॉ. सुधीर कुणावार हे आहेत. हॉस्पिटलच्या बांधकामावर निर्मिर्ती इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीचे मजूर काम करीत होते.

भिंत अंगावर पडल्याने 9 मजूर दबले 

 या कंपनीचे संचालक समीर अवधेश तिवारी आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बेसमेंटमध्ये नऊ मजूर काम करीत होते. दरम्यान, नालीच्या पाण्यामुळे दलदल निर्माण झाल्यामुळे संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये हेमराज टेंभूर्णे, दिनेश नामदेव पेंटर (वय ४०, रा. नागपूर), सुनील उके (वय २०, नागपूर), मन्सूलाल भोपा (वय १८) आणि मन्तू शिलू (वय २४) दोघेही रा. ब्रह्माडोह-रामपूर, छिंदवाडा (मध्यप्रदेश) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर राजन दरशिम्हा (वय १८, छिंदवाडा, मध्यप्रदेश), रवींद्रनाथ विश्‍वनाथ धुर्वे (४७, उदयनगर, नागपूर) विनोद शिलू (१८, रा. छिंदवाडा-मध्यप्रदेश) आणि सूरजन नांगे (वय १८, छिंदवाडा, मध्यप्रदेश) हे जखमी झाले. या सर्व मजुरांना ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नऊपैकी पाच जणांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यापैकी दिनेश नामदेव पेंटर यांचा मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.

बांधकाम ठेकेदाराला अटक
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नऊ मजुरांचा जीव धोक्‍यात होता. मजुरांना काम करताना हेल्मेट आणि लाँगबूटही पुरविण्यात आले नव्हते. संरक्षण भिंत कच्ची असल्याचे माहिती असतानासुद्धा ठेकेदाराने कोणतीही काळजी घेतली नाही. त्यामुळे एका मजुराला जीव गमवावा लागला, तर चारजण मृत्यूशी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे ठेकेदार समीर तिवारी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला रविवारी रात्रीच अटक करण्यात आली.

टॅग्स