एका एलईडीसाठी मोजले 18 हजार! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नागपूर - जिल्हा परिषदेतील बोअरवेल, सायकल घोटाळ्यांची चौकशी पूर्ण होत नाही तोच आता ग्रामंपचायतस्तरावर मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. जामठा ग्रामपंचयतीने 75 एलईडी दिवे लावण्यासाठी तब्बल 14 लाख खर्च केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सभेत समोर आली. त्यानुसार, एक दिवा लावण्यासाठी 18 हजार रुपयांचा खर्च केला. 

नागपूर - जिल्हा परिषदेतील बोअरवेल, सायकल घोटाळ्यांची चौकशी पूर्ण होत नाही तोच आता ग्रामंपचायतस्तरावर मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. जामठा ग्रामपंचयतीने 75 एलईडी दिवे लावण्यासाठी तब्बल 14 लाख खर्च केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सभेत समोर आली. त्यानुसार, एक दिवा लावण्यासाठी 18 हजार रुपयांचा खर्च केला. 

विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे येथे भव्य मैदान आहे. येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यामुळे जामठा ग्रामपंचायत जगाच्या नकाशावर आले. येथेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय कॅन्सर रुग्णालयाचे उद्‌घाटन झाले. त्यामुळे जामठा ग्रामपंचायतीची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात गेली आहे. येथे रस्त्यावर एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेण्यात आले. 75 एलईडी दिवे लावण्याचे निश्‍चित करण्यात आले. या दिव्यांसाठी दोन, चार लाख रुपये खर्च येईल, अशी शक्‍यता होती. मात्र, ग्रामसचिवांनी तब्बल 75 लाखांची बिल काढले. दिव्यासोबत वायर आणि इतर अनावश्‍यक साहित्य घेण्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे इलेक्‍ट्रिशियनकडे असणारे रबर ग्लोजही खरेदी करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. एक दिवा लावण्यासाठी 18 हजारांच्यावर खर्च आला. शैचालय बनविण्यासाठीही शासनाकडून एवढा निधी देण्यात येत नाही. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसचिवांवर कारवाई करण्याऐवजी फक्त त्यांची बदली केली. त्यामुळे एकप्रकारे प्रशासनाकडून त्यांचा गैरव्यवहार दडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. 

खासदारांच्या पत्राला केराची टोपली 
जामठा ग्रामपंचायतमध्ये वर्ष 2014-15 व वर्ष 2015-16 या काळात रस्त्यावरील दिवे खरेदीत मोठा घोटाळा झाल्याची लेखी तक्रारी माजी उपसरपंच कैलास पोटफोडे यांनी खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे केली होती. त्यांनी याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लिहिले होते. मात्र, त्यांच्या पत्राचीही दखल घेण्यात आली नाही. ग्रामसचिवांना वाचविण्याचा प्रयत्न वरच्या पातळीवरूनच होत असल्याचे दिसत आहे.

Web Title: nagpur news leb lamp