भाकपचे नेते कॉ. मनोहर देशकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नागपूर - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच पक्षाच्या केंद्रीय कंट्रोल कमिशनचे सचिव कॉ. मनोहर देशकर (वय ८०) यांचे बुधवारी (ता.१७) निधन झाले.  उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता कामठी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

नागपूर - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच पक्षाच्या केंद्रीय कंट्रोल कमिशनचे सचिव कॉ. मनोहर देशकर (वय ८०) यांचे बुधवारी (ता.१७) निधन झाले.  उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता कामठी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

वयाच्या ऐंशीव्या वर्षातही कॉ. देशकर पक्षकार्यात सक्रिय होते. १२ जानेवारीला पक्ष कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीला मार्गदर्शन केले. आगामी जिल्हा अधिवेशन घेण्याची सूचनासुद्धा त्यांनी केली होती. कामठी छावणी परिसरात ते राहात होते. पक्षकार्यासाठी ते नेहमीच नागपूर-कामठी  बसने येत होते. कॉ. देशकर यांचा जन्म सुखवस्तू कुटुंबात झाला. वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. त्यामुळे त्यांचे काही शिक्षण आफ्रिकेत झाले. विद्यार्थिदशेतच कम्युनिस्ट पक्षाविषयी त्यांना आकर्षण होते. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर ते कुटुंबीयांचा विरोध झुगारून भाकपमध्ये सहभागी झाले. टिळक पुतळा येथील कम्युनिस्ट पक्ष कार्यालयाचे सचिव म्हणून  त्यांनी धुरा सांभाळली. पक्षाचे दिवंगत नेते कॉ. ए. बी. बर्धन यांचा सहवास त्यांना लाभला. विणकर सभा कृती समिती, ट्रान्सपोर्ट कामगार युनियन, पॉटरीज मजूर सभा, खदान कामगार, विडी कामगारांच्या संघटना त्यांनी बांधल्या. पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य, राज्य कमिटीचे सचिवसुद्धा ते होते. देशकर यांच्यामागे पत्नी आशा देशकर, मुलगा, मुलगी, जावई असा आप्त परिवार आहे.

Web Title: nagpur news manohar deshkar Passed away