तावडेंच्या अंगावर बुक्का टाकणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

विधानसभा निवडणुकीवेळी सत्तेवर आल्यावर 15 दिवसात धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले होते.  मात्र, सत्तेत आल्यानंतर भाजपने आरक्षणाच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले.

नागपूर : येथील धनगर आरक्षण निर्णायक मेळावा उधळण्यासाठी पारंपरिक धनगर वेष करून निघालेल्या मल्हार क्रांतीचे राज्याध्यक्ष मारुती जानकर यांना भादुरा टोलनाक्यावर (नागपूर) पोलिसांनी ओळखले. त्याच्या सह 4 कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत. मागील महिन्यात यांनीच विनोद तावडे यांच्या अंगावर बुक्का टाकला होता. 

विधानसभा निवडणुकीवेळी सत्तेवर आल्यावर 15 दिवसात धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले होते.  मात्र, सत्तेत आल्यानंतर भाजपने आरक्षणाच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले.

तीन वर्षे झाली निर्णय घेतला नाही. असे असताना निर्णायक मेळावा घेऊन खासदार डॉ. विकास महात्मे समाजाच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करत आहेत. त्यामुळे हा मेळावा उधळून लावण्याची भूमिका मल्हार क्रांतीने घेतली होती.  त्यानुसार मारुती जाणकर व कार्यकर्ते मेळाव्याच्या ठिकाणी निघाले होते.

Web Title: Nagpur news Maruti Jankar arrested