छोटी धंतोलीतील पटांगण मेट्रो रेल्वेला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नागपूर - छोटी धंतोली येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण बदलण्यात आले. हे पटांगण मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पासाठी देण्यात आल्याने त्याच्या आरक्षणात बदल करून ते वाणिज्य वापरासाठी खुले करण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या फेरबदलास मंजुरी देण्यात आली. 

नागपूर - छोटी धंतोली येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण बदलण्यात आले. हे पटांगण मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पासाठी देण्यात आल्याने त्याच्या आरक्षणात बदल करून ते वाणिज्य वापरासाठी खुले करण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या फेरबदलास मंजुरी देण्यात आली. 

मौजा धंतोली येथील खसरा क्रमांक ९८ ते १०१, सि.स. क्र.९ क्षेत्र १९८८९.९० चौरस मीटर क्षेत्र खेळाच्या मैदानासाठी आरक्षित होते. कर्णेवार क्रिकेट स्पर्धा येथे नियमित भरविल्या जात होत्या. कर्णेवार स्पर्धेचे ग्राउंड म्हणूनच याची ओळख निर्माण झाली होती. मात्र, मेट्रो रेल्वेने मुख्य जंक्‍शनसाठी ही जागा मागितली होती. पूर्व-पश्‍चिम आणि उत्तर-दक्षिण धावणार मेट्रो रेल्वे बर्डीवर इंटरलिंकिंग होणार आहे. याशिवाय मुख्य स्थानक म्हणूनही ते येथेच विकसित केले जाणार आहे. उपयोगीतेच्या बदलास आज मंजुरी देण्यात आली असली तरी ती गृहित धरूनच मेट्रो रेल्वेस्थानकाचे काम सुरू केले आहे. ग्राउंडवर मोठमोठे पिलर उभे करण्यात आले आहे. उपयोगिता बदलल्याने मेट्रो रेल्वेच्या मुख्य स्थानकातील मुख्य अडसर दूर झाला आहे. विशेष म्हणजे नागपूरच नव्हे, तर विदर्भातील प्रामुख्याने सर्वच मोठे प्रकल्प जागेमुळे अडले आहेत. याच कारणामुळे अनेक प्रकल्प सुरू होऊ शकले नाही, तर काही प्रचंड विलंबाने सुरू झालेत. काही प्रकल्पांच्या जागांचे अद्याप वाद कोर्टात सुरू आहेत. पुनर्वसन, न्यायनिवाडे आणि मोबदल्यात ते अडकले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरकर असल्याने मेट्रो रेल्वेसाठी कुठलाही वाद-विवाद, आंदोलने-प्रतिआंदोलने, कोर्टकचेऱ्या न होता मेट्रोला स्थानकासाठी जागा मिळू शकली.

Web Title: nagpur news metro