ढोल-ताशांच्या गजरात मेट्रो डब्यांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागपूर - मेट्रो रेल्वे केव्हा सुरू होईल, खरंच धावणार आहे का, आणखी दहा वर्षे काही खरे नाही, केवळ सत्ताधाऱ्यांचा दिखावा आहे? असे असंख्य प्रश्‍न मेट्रो रेल्वेबाबत दररोज उपस्थित केले जातात. सर्वसामान्यांना अद्याप आपल्या शहरात मेट्रो सुरू होईल, याचा विश्‍वासच बसत नाही. मात्र, मेट्रो रेल्वेने आज नागपूरकरांना सुखद धक्का दिला. ट्रायल रनसाठी तीन कोचेस शहरात आणले. 

बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हैदराबाद येथून तीन कोचेस शहरात आले. खापरी येथे मैत्री परिवारच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. प्रथमच मेट्रो रेल्वे कोचेस आल्याने ढोल-ताशांनी त्यांचे स्वागतसुद्धा करण्यात आले. कोचेस बघण्यासाठी खापरी येथे चांगलीच गर्दी उसळली होती. आत कोचेस आले. यामुळे माझी मेट्रो लवकरच धावेल, असाही विश्‍वास अनेकांनी व्यक्त केला. सध्या कोचेस मिहान डेपो येथे ठेवण्यात आले आहेत. हैदराबादच्या प्रोकेम लॉजिस्टक या ट्रान्सपोर्ट कंपनीने ट्रेलरने ते नागपूरला आणले. याकरिता पाच दिवसांचा अवधी लागला. लवकरच मेट्रोची ट्रायल रन सुरू केली जाणार आहे. 

नागपूरच्या मेट्रो रेल्वेचे काम झपाट्याने सुरू आहे. अवघ्या तीन वर्षांत निम्मे काम पूर्ण झाले आहे. शहराभर मेट्रोच्या मार्गाचे नेटवर्क उभारण्याचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामाच्या वेगाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. यामुळे पुण्याची मेट्रो विकसित करण्याचेही काम नागपूरच्याच मेट्रोला देण्यात आले आहे.