आंदोलनातून वेधले प्रशासनाचे लक्ष

आंदोलनातून वेधले प्रशासनाचे लक्ष

नागपूर - आपल्या विविध मागण्या व समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आज क्रांतिदिनाचा मुहूर्त साधत बुधवारी (ता. ९) एकदिवसीय सामूहिक रजा घेऊन कामबंद आंदोलन केले. यामुळे  कामांसाठी आलेल्‍या सर्वसामान्‍य नागरिकांना मनस्‍ताप सहन करावा लागला. आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास १० ते १४ ऑगस्टदरम्यान काळ्या फिती लावून काम करणे, १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर जिल्हास्तर, तालुकास्तर लोकप्रतिनिधींना माहिती देणे तसेच २१ पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.  

कळमेश्‍वर - न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या एकदिवसीय संपात कळमेश्‍वर पालिकेचे कर्मचारी संघाचे सचिव-निशिकांत पाटील, सुनील चौधरी, प्रणित बुरंडे, भाग्यश्री टोंगसे, ओमकार घुमडे, दत्तराज रोडे, दिलीप धोटे, रमेश सकोडे, शफी शेख, जितेंद्र हिरुडकर, कैलास मंडलिक, निकिता देशमुख, विजय मस्की, कमलाकर झाडे, बंदीश बिजवार, सुनील, गुल्हाने आदींसह वर्ग ३ व वर्ग ४ चे कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी सहभागी झाले. 

कामठी - कामठी नगर परिषद सभागृहात कर्मचारी संघटनेच्या बैठकीत महाराष्ट्र स्तरावरील संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनात अध्यक्ष मोहन सातपुते, उपाध्यक्ष मसूद अख्तर, सचिव प्रदीप भोकरे, सहसचिव विजय मेथिया, संजय जयस्वाल आदींचा समावेश होता. 

सावनेर - नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संघमित्रा ढोके यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात अशोक चरपे, ॲड. अरविंद लोधी, रामराव मोवाडे, बंडू दिवटे, नगरसेवक तुषार उमाटे, दीपक बसवार, सुनील चापेकार, माजी नगरसेवक सुजित बागडे आदींनी सहभाग नोंदविला. 

हिंगणा - नगर परिषद कार्यालय बंद असल्याने नागरिकांना आल्यापावली परतावे लागले. 
आंदोलनात नगरपंचायतीचे कर्मचारी गणेश पात्रे, अमोल घोडमारे, संजय माहुरे, चैतन्य डाहे, वानाडोंगरी नगर परिषदेचे किरण रोगे, हरिश्‍चंद्र बारंगे, देवेंद्र शेंडे, देवीदास बेलेकर, उमेंद्र किन्हेकर, कुमुद सोनटक्‍के, लीलाधर डाखळे, सोनाली राऊत, सोनाली सोमनाथे आदी सहभागी झाले. 

काटोल - नगर परिषदेतील आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राहुल देशमुख, मनोज जवंजाळ, नितीन गौरखेडे, राजेंद्र काळे, कैलास खंते, समीर गणवीर, राजू घोडके, आशीष पंडिलवार, विजयकुमार आत्राम, विजय ठाकरे, बोरकर, सावरकर, बावनकर, प्रकाश सारवान  आदी सहभागी झाले. 

मौदा - आंदोलनात कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष संदीप लाडे, सल्लागार राजेशसिंह परमार, कोषाध्यक्ष लीलाधर बारापात्रे, मिलिंद डुकरे, कैलाश भोले, जयंत वानखेडे, योगिता निंबार्ते, नेहा पोतले, उपस्राव कोहाड, घनश्‍याम निनावे, चंद्रभान बावणे, सूरज उके, सुनील हेडाऊ यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले.

वाडी - नगर परिषदेच्या आवारात दुपारी १ वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मुख्याधिकारी राजेश भगत, विनोद जाधव, आकाश सहारे, रमेश इखनकर, योगेश जहागीरदार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी लक्षमण ढोरे, के. एम. तिजारे, प्रणाली दुधबळे, एस. एस. करवाडे, प्रमोद माने, आश्‍लेषा भगत, अवी चौधरी, बी. पी. निकाजू, रोहित सेलारे, श्रावण इखनकर, बी. एस. ढोके, धर्मेंद्र गोतमारे, रवींद्र रडके, रमेश पढाल आदी सहभागी झाले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com