सोनेगाव परिसरात मजुराचा खून

सोनेगाव परिसरात मजुराचा खून

नागपूर - सोनेगाव परिसरात मजुराचा त्याच्याच मित्राने दगडाने ठेचून खून केला. ही घटना काल (ता. २३) दुपारच्या सुमारास घडली. सोनेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली.

दिनेश धरमसिंह उईके (वय ३०, दाते ले-आउट) असे मृताचे नाव आहे. तर आरोपीचे नाव दिनेश अशोक कोटांगळे (वय २५, पन्नासे ले-आउट) आहे. आरोपी आणि मृत मित्र होते. पत्नीबाबत अपशब्द बोलण्याच्या कारणावरून आरोपीने खून केल्याचे बोलले जाते.   

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश उईके आणि दिनेश कोटांगळे दोघेही मजुरी करीत होते. दोघेही रोज प्रतापनगर ठिय्यावर जात होते. 

काम मिळाल्यास कामावर जात होते. दोघांनाही दारूचे व्यसन होते. गुरुवारी सकाळी दोघेही नेहमीप्रमाणे ठिय्यावर गेले. काम न मिळाल्याने दारू पिण्यासाठी गेले. मेंढे ले-आउट येथील रचना अपार्टमेंटजवळ दोघेही २ वाजतापर्यंत दारू प्यायले. दरम्यान, त्यांच्या वाद झाला. मृत आरोपीच्या पत्नीबाबत अपशब्द बोलत होता. आरोपीने दिनेशला समजविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो ऐकण्यास तयार नव्हता. यामुळे त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. आरोपीने दिनेश उईकेच्या डोक्‍यावर दगडाने हल्ला केला. 

रक्‍तबंबाळ झालेल्या उईकेला आरोपी सोडून पळून गेला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मृताचे वडील धरमसिंह घटनास्थळी आले. त्यांची मृताची ओळख केली. मृतासोबत कोण होता, याची माहिती पोलिसांनी घेतली. दोन तासांच्या आत आरोपीला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com