प्रियकराच्या भावाचा खून

प्रियकराच्या भावाचा खून

नागपूर - पाचपावली उड्‌डाणपुलावर रात्रीच्या सुमारास अश्‍लील चाळे करीत बसलेल्या प्रेमी युगुलाची छेड काढणे एका युवकाच्या जीवावर बेतले. युवकाने शेरेबाजी केल्यामुळे नाराज झालेल्या प्रेयसीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी छेडखानी करणाऱ्या युवकाचा भरचौकात चाकूने भोसकून खून केला. अक्षय सुनील भोयर (23, रा. बारसेनगर, पाचपावली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्याकांडात मुख्य आरोपी सोनी ऊर्फ निकुंज शनगरवार, अक्षय रमेश निमजे आणि संतोष ऊर्फ लाला निळकंठ खापेकर यांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीला दहाला अभिनव ऊर्फ शॅंकी महेंद्र भोयर (वय 18) हा त्याच्या प्रेयसीसोबत दादरापुलाजवळ बसला होता. त्यावेळी निकुंज, लाला आणि अक्षय हे शॅंकीजवळ आले. त्याच्या प्रेयसीवर त्यांनी शेरेबाजी केली. त्यानंतर आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन शॅंकीच्या प्रेयसीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांचे मोबाईलने फोटोही काढले. त्यावेळी शॅंकी आणि निकुंजमध्ये वाद झाला आणि मारामारी झाली. दरम्यान, काही लोकांनी मध्यस्थी केल्याने दोघांत वाद मिटला. मात्र, त्यावेळी दोघांनी एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिली. गुरुवारी सकाळी साडेदहादरम्यान निकुंज व त्याचे साथीदार शॅंकीच्या घरी पोहोचले. त्यांनी शॅंकीला बोलायचे आहे, असे म्हणत दादरापुलाजवळ बोलावले. त्या ठिकाणी शॅंकी व निकुंजमध्ये पुन्हा भांडण झाले. यानंतर त्यांनी एकमेकांना मारहाणही केली. घटनेनंतर शॅंकीने त्याचा चुलतभाऊ अक्षयला फोन करून याबाबत माहिती दिली. अक्षय मदतीसाठी पोहोचताच निकुंजने त्याला कानशिलावर लगाविली. अक्षयने निकुंज व त्याच्या साथीदारांचा प्रतिकार केला. आपल्यावर वरचढ होत असल्याचे पाहून निकुंजने चाकू काढून अक्षयच्या पोटात खुपसला. यामध्ये अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. शॅंकीने अक्षयला उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तहसील पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली. मात्र, प्रत्यक्षदर्शींनुसार मारेकरी हे 5 ते 6 होते. परंतु, आरोपींच्या नुसार त्या तिघांनी खून केल्याचे कबूल केले आहे. अक्षय हा बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. 

कोवळ्या वयात गुन्हेगारीत पदार्पण 
या हत्याकांडातील सर्वच आरोपींनी जेमतेम वयाची 18 ते 19 वर्षे पार केली. यौवनाच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी गुन्हेगारी जगतात पदार्पण केले. आरोपींवर गुन्हा सिद्ध होईल आणि त्यांना शिक्षाही मिळेल. मात्र, या हत्याकांडामुळे युवावर्गासाठी संदेश दिला आहे. केवळ मुलीच्या प्रेमात वेड्या झालेल्या युवकांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण झाल्याचे चित्र या घटनेतून समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com