बिअरबारमध्ये गोळ्या झाडून हत्या

बिअरबारमध्ये गोळ्या झाडून हत्या

खापरखेडा - शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोराडी मार्गावरील राज बाबा बिअरबारमध्ये चार पाच मित्रात आपसात वादविवाद झाला. त्यानंतर बिअरबार बाहेर गेले. पुन्हा वाद वाढला. काही वेळानंतर गोळ्यांचा आवाज आला. गोळीबारात डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन आकाश पानपत्ते याचा मृत्यू झाला. मृत हा एका खुनातील आरोपी असून, त्याच्यावर गोळ्या झाडणारा आरोपीदेखील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे.

आकाश पानपत्ते (२७, रा. वॉर्ड क्रमांक - १, खापरखेडा, ता. सावनेर) हा त्याच्या मित्रांसोबत खापरखेडा - कोराडी मार्गावरील राजबाबा बियर बारमध्ये बसला होता. तो रात्री ८ वाजताच्या सुमारास बारमधून बाहेर पडताच आरोपीने त्याच्या डोक्‍यावर तब्बल तीन गोळ्या झाडल्या आणि तिथून लगेच पळून गेला. आकाशचा मित्र नीलेश डेहरिया याने आकाशला लगेच खापरखेडा येथील डॉ. पवार यांच्या हॉस्पिटन्लमध्ये नेले. डॉ. पवार यांच्या सूचनेवरून त्याला मानकापूर (नागपूर) येथील ॲलेक्‍सिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्‍टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. हा प्रकार बारच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आकाशवर खापरखेडा येथरील सूरज कावळे याने गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली. काही वर्षांपूर्वी वेकोलिच्या सिल्लेवाडा येथील कार्यालयात मेहताब खान याचा खून करण्यात आला होता. आकाश हा मेहताब खान याच्या खुनातील एक आरोपी होता. आकाशचा खून मेहताबच्या समर्थकांनी केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस त्यादिशेने तपास करीत आहेत. सूरज कावळे याच्याकडे संशयित म्हणून बघितले जात असून, तोही सराईत गुन्हेगार असल्याची तसेच त्याचे आकाशसोबत जुने वैमनस्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com