हजारो मुस्लिम महिलांचा हुंकार

हजारो मुस्लिम महिलांचा हुंकार

नागपूर - केंद्र शासनाने लोकसभेत मांडलेले तीन तलाकचे विधेयक मागे घ्यावे, यासाठी मुस्लिम लॉ बोर्डने केलेल्या आवाहनानुसार मंगळवारी हजारो महिलांनी शांती मोर्चा काढून विधेयकाच्या विरोधात रोष व्यक्त केला. मुस्लिम कायद्यात सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही, असे फलक झळकावून शरीअतमध्ये फेरबदल करण्याचे प्रयत्न करण्यात येऊ नये, असा इशारा सरकारला दिला.

मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास श्री मोहिनी कॉम्प्लेक्‍सपासून शांती मोर्चा सुरू झाला. मुस्लिमांच्या प्रत्येक पंथातील धर्मगुरूंनी मोर्चाला हिरवी झेंडी दाखविली. एलआयसी चौक, आरबीआय चौक, झीरो माइल, भारतीय विद्याभवन येथून संविधान चौकात महिला एकत्रित  झाल्या. मुस्लिम समाजाच्या हजारो महिला प्रथमच एकत्रित आल्यात. येथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य प्रो. मोनिसा बुशरा आबिदी यांनी तीन तलाकचे विधेयक मुस्लिम समाजावर अन्याय करणारे असल्याचे सांगितले. हे विधेयक मुस्लिम समाजातील कौटुंबिक  एकोपा नष्ट करणारे असून, संविधानाच्या विरोधातही असल्याचा आरोप त्यांनी केला. मालेगावच्या आलिया बाजी, अरजुमंद बाजी, उजमा पारेख, रब्बानी बाजी आदींनीही महिलांना संबोधित केले. आयोजनासाठी पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य हाजी अब्दुल वहाब पारेख, मुफ्ती अब्दुल कदीर खान, मौलाना मो. मुर्तजा, मौलाना आलमगीर अशरफ, मौलाना अब्दुल रशीद कलंदर, मुफ्ती आमिर मालेगाव, मुतवल्ली हनीफ पटेल, सुफी जमालुद्दीन, अब्दुल बारी पटेल, मौलाना जुबेर अशरफी, मौलाना अलीमुर्रहमान, मौलाना शाकीररुल इस्लाम, हाफीज मसऊद अहमद, मुफ्ती मो. अकरम, मौलाना इमरान अखतर नदवी, मुफ्ती इमराना कासमी, मुफ्तह नरुल्लाह, मुफ्ती फारूक, मौलाना हुस्सामुद्दीन, हाजी मो. अयुब अशरफी, शकील पटेल, अतिक कुरेशी, मो. शाहीद नुरा, जावेद अखतर निलो, मो. मुखतार अन्सारी, बाबा भाई कल्पना डेकोरेशन, मजीद काँट्रॅक्‍टर, इम्तियाज पाशा, ॲड. कुतुब जफर, ॲड. गुलाम अहमद आदींनी सहकार्य केले. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जीवही देणार
शरीअत मुस्लिम समाजासाठी सर्वकाही आहे. त्यात कोणी हस्तक्षेप केल्यास सहन केले जाणार नाही. प्रत्येक महिलेला शरीअत प्राणापेक्षा प्रिय असल्याचे सांगून यासाठी जीव देण्याचीही तयारी असल्याचा इशारा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com