अवयवदानाबाबत नागपूर होईल स्मार्ट - नंदा जिचकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नागपूर - मेंदूमृत्यू झालेल्या रुग्णाच्‍या अवयवांचे दान करणे हा एकमेव उपचार समजून इतरांचा जीव वाचवावा, हीच काळाची गरज आहे. हा विचार डोळ्यांसमोर ंठेवून मृत्यूनंतर अवयवांचे दान करण्यात नागपूर स्मार्ट होईल, असा विश्‍वास महापौर नंदा जिचकार यांनी आज (ता. १३) व्यक्‍त केला. 

नागपूर - मेंदूमृत्यू झालेल्या रुग्णाच्‍या अवयवांचे दान करणे हा एकमेव उपचार समजून इतरांचा जीव वाचवावा, हीच काळाची गरज आहे. हा विचार डोळ्यांसमोर ंठेवून मृत्यूनंतर अवयवांचे दान करण्यात नागपूर स्मार्ट होईल, असा विश्‍वास महापौर नंदा जिचकार यांनी आज (ता. १३) व्यक्‍त केला. 

दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात जागतिक अवयवदानदिन साजरा करण्यात आला. या वेळी महापौर जिचकार यांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प केला. तसा रीतसर अर्जही भरून दिला. जिल्हा प्रशासन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेसहित महापालिका, नागपूर रोटरी क्‍लब, अकादमी ऑफ मेडिकल सायन्स, जनआक्रोश, जेसिस क्‍लब ऑफ नागपूर, मोहन फाउंडेशन, विभागीय अवयवदान समिती इत्यादी  संस्थांच्या संयुक्त विद्यमाने उपराजधानीत जल्लोषाच्या वातावरणात अवयवदान मिरवणूक काढली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी हिरवी झेंडी दाखवली. अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. समीर जहांगीरदार, यांच्या मार्गदर्शनात ही रॅली शहराच्या विविध भागांत फिरविण्यात आली. 
 

हृदय, यकृत प्रत्यारोपण यंत्रणा असावी
किडनी प्रत्यारोपणासाठी दोन लाखांहून अधिक रुग्ण नोंदणी करतात; परंतु  त्यातील आठ हजार रुग्णांनाच किडनीचे दान होते. साठ हजार रुग्णांना हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे. ८५ हजार रुग्ण यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. दात्यांच्या कमतरतेमुळे बरेच रुग्ण दगावतात. उपराजधानीत दरवर्षी पन्नासपेक्षा जास्त किडनी प्रत्यारोपण होतात. आता हृदय आणि यकृत प्रत्यारोपण करणारी यंत्रणा उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असे मत विभागीय अवयवदान समितीचे सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी व्यक्त केले.

Web Title: nagpur news nagpur smart in body part donate