पदवीधर गटाच्या निवडणुकीसाठी 20 हजारांवर मतदार 

पदवीधर गटाच्या निवडणुकीसाठी 20 हजारांवर मतदार 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर गटातील 10 जागांसाठी बी. फॉर्मची ऑनलाइन नोंदणी सात डिसेंबरला संपली. नोंदणी झालेल्या एकूण मतदारांना 11 डिसेंबरपर्यंत हार्डकॉपी विद्यापीठात जमा करावयाची होती. मात्र, 27 हजार 958 ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या पदवीधरांपैकी केवळ 20 हजार 800 मतदारांनीच प्रत्यक्षात अर्ज आणून दिल्याने तेच फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान करतील. 

सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पदवीधरांच्या नोंदणीसाठी दिलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत 16 हजारांवर नवे मतदार तयार केले. यानंतर 14 नोव्हेंबरपासून बी. फॉर्म ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया राबविली. नवे मतदारवगळता बी. फॉर्मची संख्या 87 हजारांवर होती. मात्र, यावर्षी नव्या कायद्यानुसार बी. फॉर्म भरल्यानंतर "हार्डकॉपी'सोबत पदवीची प्रत देण्याचा नियम लावला. यामुळे 7 डिसेंबरपर्यंत 27 हजार 958 मतदारांनी बी. फॉर्मचे ऑनलाइन अर्ज भरले. मात्र, त्यानंतरही विविध संघटनांकडून 20 हजार 800 मतदारांच्या अर्जाची "हॉर्डकॉपी' पदवीच्या प्रतीसह जमा करता आली. 2010 मध्ये पार पडलेल्या पदवीधर गटातील 10 जागांसाठी घेतलेल्या निवडणुकांमध्ये 33 हजार 10 पदवीधरांची मतदार म्हणून नोंदणी केली होती. आता विद्यापीठाद्वारे यादी प्रकाशित करून त्यावरील आक्षेप मागविण्यात येणार आहेत. 

प्रक्रिया 
18 डिसेंबर - तात्पुरती मतदार यादी 
22 डिसेंबर - कुलसचिवांकडे आक्षेप नोंदविणे 
29 डिसेंबर - कुलगुरूंकडे आक्षेप नोंदविणे 
3 जानेवारी - अंतिम मतदारयादी प्रकाशित करणे 

निवडणूक प्रक्रिया 
12 जानेवारी - उमेदवारी अर्ज नोंदविण्याची अंतिम तारीख. 
13 जानेवारी - आलेल्या अर्जाची छाननी. 
14 जानेवारी - वैध अर्जांची तात्पुरती यादी. 
17 जानेवारी - कुलगुरूंकडे आक्षेप नोंदविणे. 
20 जानेवारी - पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करणे. 
23 जानेवारी - उमेदवारी अर्ज मागे घेणे. 
24 जानेवारी - वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित करणे. 
4 फेब्रुवारी - निवडणुकांसाठी मतदान. 
6 फेब्रुवारी - मतमोजणी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com