विद्यापीठाच्याच पदवीधराला उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह इतर विद्यापीठांमध्ये प्राधिकरणांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. विद्यापीठांमध्ये सध्या पदवीधरांच्या दहा जागांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी नवीन कायद्यानुसार होणार आहेत. कायद्यानुसार पदवीधराने ज्या विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याच विद्यापीठातील निवडणुकांमध्ये त्याला उमेदवार किंवा मतदार म्हणून सहभागी होता येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या विद्यापीठातून पदवी घेत मतदार झालेल्यांची नावे यावर्षीच्या नव्या यादीतून रद्द करण्यात येणार आहे. 

विद्यापीठामध्ये सध्या प्राधिकरण निवडणुकांची धामधूम सुरू आहे. विशेष म्हणजे  विद्यापीठाने १२ जुलैपासून विद्यापीठाद्वारे पदवीधर नोंदणीची सुरुवात करण्यात आली. १२ ऑगस्टर्यंत उमेदवारांना त्याची नोंदणी करावी लागणार आहे. जुन्या कायद्याप्रमाणेच नव्या मतदारांना ‘ए’फार्मसोबत पदवी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावा लागणार आहे. शिवाय जुन्या मतदारांना ‘बी’फार्म भरून मतदार होता येणार आहे. मात्र, जुन्या विद्यापीठ कायद्यात कुठल्याही विद्यापीठात असलेल्या पदवीधर मतदाराला पदवीच्या आधारे मतदान करता येणे शक्‍य होत होते. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठातून वेगळे झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बरेच पदवीधर गतवर्षीपर्यंत नागपूर विद्यापीठात मतदान करायचे. मात्र, नव्या विद्यापीठ कायद्यात यात संशोधन करीत, ज्या विद्यापीठात मतदाराने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्याच विद्यापीठात त्याला मतदान करण्याचा अधिकार आणि निवडणुकीत सहभागी होता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यानुसार विद्यापीठ या मतदारांची नावे शोधून ती ‘डिलीट’ करणार आहे. त्यामुळे बऱ्याच पदवीधरांची संख्या घटण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे नव्या मतदारांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. सध्या विद्यापीठात पदवीधरांसाठी दीड लाखाहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत.

गोंडवानातील पदवीधर नागपुरात मतदान करणार!
पाच वर्षांपूर्वी गोंडवाना विद्यापीठ नागपूर विद्यापीठामधून वेगळे करण्यात आले. मात्र, बऱ्याच विद्यार्थ्यांची पदवी नागपूर विद्यापीठातून झाली असल्याने या नियमानुसार त्यांना गोंडवाना विद्यापीठातील पदवीधर निवडणुकांमध्ये सहभाग नोंदविता येणार नाही हे विशेष.