कारच्या ऑनलाइन विक्रीतून पावणेसहा लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नागपूर - ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ॲपवर विक्रीसाठी असलेल्या एका कारचा १४ लाख रुपयांत सौदा केला. त्यासाठी एका युवतीला ५ लाख ८० हजार रुपये दिले.  मात्र, कार विक्रीची जाहिरात खोटी असल्याचे कळल्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अमेरिकेतील नागरिकासह युवतीवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, किरण दिनेश मुळेकर (वय ३८, श्रीनगर, गणेश हाउसिंग सोसायटी) यांनी १८ मे रोजी एका वेबसाईटवर कार विक्रीची जाहिरात बघितली. नव्या कोऱ्या कारची किमत केवळ १४ लाख असल्याचे पाहून त्यांना मोह आवरता आला नाही. त्यांनी लगेच कार मालक अभिमन्यू विष्णू जोशी (रा. शिकागो, अमेरिका) याच्याशी संपर्क साधला. ‘माझी कार मुंबई विमानतळावर उभी आहे. तेथे प्रियांका शर्मा या पार्किंग ऑफिसर आहेत. त्यांना भेटून तुम्ही कार बघून घ्या.’ असे सांगितले. आरोपी प्रियांका शर्मा हिची भेट घेतली असता तिने ५ लाख ८० हजार रुपये भरण्यास सांगितले. पैसे बॅंकेच्या खात्यावर भरल्यानंतर लगेच अभिमन्यू जोशी यांनी साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. किरण यांना संशय आल्यामुळे त्यांनी बॅंकेत चौकशी केली असता खात्यातून पैसे निघाल्याचे कळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी प्रियांका आणि अभिमन्यू जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.