शहरात ‘पे ॲण्ड पार्क’ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नागपूर - कुठेही वाहने पार्क करून वाहतुकीची कोंडी करणाऱ्यांविरोधात महापालिकेने पार्किंगचे धोरण तयार केले आहे. या धोरणाअंतर्गत आता वाहनतळावरच नागरिकांना पार्किंग  करता येणार असून, दुचाकीधारक, तीनचाकी, पाचचाकी व्यावसायिक वाहनांकरिता १० रुपये, चारचाकीसाठी २०, तर सायकलसाठी पाच रुपये पार्किंग शुल्क द्यावे लागणार आहे. अर्थात या रकमेत केवळ आठ तास वाहने पार्क करता येणार आहे.

शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. वर्दळीच्या ठिकाणी पार्किंग समस्येने विक्राळ रूप धारण केले असून, कुठेही वाहने लावण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेनने पार्किंग धोरण तयार केले आहे. ऑक्‍टोबर २०१६ मध्येच पार्किंग धोरणाला मान्यता मिळाली असली तरी पे ॲण्ड पार्क कुठे होणार, त्याचे दर किती याबाबत निश्‍चित नव्हते. आता दर निश्‍चित करण्यात आले असून, येत्या २० जून रोजी होणाऱ्या महापालिका सभेत मंजुरीसाठी येणार आहे. 

मेट्रो रेल कॉरिडॉर, हाय वे, कमर्शियल एरिया, कोर सिटी एरिया  सदर, सीताबर्डी, इतवारी,  महाल, लकडगंज, महाल, धरमपेठ, काँग्रेसनगर, गणेशपेठ येथे पेड पार्किंगची सुविधा उपलब्ध राहील. त्याशिवाय इतर रहिवासी आणि सार्वजनिक ठिकाणी आवश्‍यकतेनुसार पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. येथे दर तासाप्रमाणे तसेच ऑफ स्ट्रिट आणि ऑन स्ट्रिट पार्किंगचे दर निश्‍चित करण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान केले जातील.   गोरक्षण रहाटे कॉलनी, इंडियन जिमखाना ग्राउंड, पंचशील चौक ते जनता चौक प्लाय ओव्हरच्या खालील जागा आणि वरील जागा, यशवंत स्टेडियम समोरील जागा, काचीपुरा ते क्रिम्स  हॉस्पिटल्स मार्ग (दक्षिणेस) येथे महापालिकेचे ‘पे ॲण्ड पार्क’ होणार आहे.