जिल्ह्यातील फार्मसी आज बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

नागपूर - नियमांवर बोट ठेवत औषध विक्रेत्यांवर अटी लादल्या जातात. परंतु,  दुसरीकडे अवैधरीत्या ऑनलाइन औषधविक्री सुरू आहे. या औषध विक्रीतून नियमांचे उल्लंघन होत आहे. सरकारच्या या धोरणाविरुद्ध देशभरातील औषध विक्रेत्यांनी मंगळवार, ३० मे रोजी संप पुकारला असून, नागपूर जिल्ह्यातील ४ हजार फार्मसी बंद राहणार आहेत. याचा फटका रुग्णांना बसणार असून, रुग्ण आणि नातेवाइकांची तारांबळ उडणार आहे.  

नागपूर - नियमांवर बोट ठेवत औषध विक्रेत्यांवर अटी लादल्या जातात. परंतु,  दुसरीकडे अवैधरीत्या ऑनलाइन औषधविक्री सुरू आहे. या औषध विक्रीतून नियमांचे उल्लंघन होत आहे. सरकारच्या या धोरणाविरुद्ध देशभरातील औषध विक्रेत्यांनी मंगळवार, ३० मे रोजी संप पुकारला असून, नागपूर जिल्ह्यातील ४ हजार फार्मसी बंद राहणार आहेत. याचा फटका रुग्णांना बसणार असून, रुग्ण आणि नातेवाइकांची तारांबळ उडणार आहे.  

औषधांच्या ऑनलाइन विक्रीविरुद्ध अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने मंगळवारी बंद पुकारला. देशातील ८ लाख आणि राज्यातील ५५ हजार तर नागपूर जिल्ह्यातील ४ हजार औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होतील. ऑनलाइन औषध विक्रीमुळे गर्भपाताच्या गोळ्या, अमली पदार्थांची विक्री वाढली. झोपेच्या गोळ्यांसारखी आरोग्याला घातक औषधे सहज उपलब्ध होत आहेत. याचा विपरीत परिणाम तरुण पिढीवर होत आहे.

 उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करूनही सरकारने याची दखल घेतली नाही. शिवाय, अशा स्वरूपाच्या औषध विक्रीमुळे कमी दर्जाची अप्रमाणित औषधे ग्राहकांच्या पर्यायाने नागरिकांच्या घशाखाली उतरविली जाताहेत. वेदनाशामकांच्या वापरावर शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. अशी तक्रार राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी केली.  

फार्मसी कौन्सिलचे सदस्य हरीश गणेशानी म्हणाले, प्रगत देशांनी जी औषध विक्री बेकायदेशीर ठरविली ती आपल्या देशात सर्रास विकली जात आहेत. त्यामुळे एकंदर औषध विक्रीवर संशय व्यक्त होत आहे. ऑनलाइन औषधविक्री घातक आहे. हा लढा सरकारी धोरणांविरुद्ध आहे. रुग्णांना त्याची झळ बसू नये यासाठी औषधविक्रेता संघटना तातडीच्या वेळेतही सेवा सुरू राहील, असे सांगण्यात आले. 

मेडप्लस, अपोलो मदतीला 
साखळी स्वरूपातील औषध विक्रीची दुकाने या संपात सहभागी राहणार नाहीत, अशी माहिती अन्न व औषध प्रसासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी दिली. त्यामुळे रुग्णांनी भीती बाळगण्याची गरज नाही. शिवाय औषध जीवनावश्‍यक बाब असल्याने तातडीच्या प्रसंगी सेवा देण्याच्या सूचनादेखील विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन न करणाऱ्यांची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करता येईल, असेही केकतपुरे म्हणाले.

विदर्भ

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून...

03.42 PM

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर जारावंडी मुख्य रस्त्यावरून वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुलाचे नुकसान...

02.09 PM

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017