ठाण्याचा ‘मदरबोर्ड’  म्हणजे रायटर

ठाण्याचा ‘मदरबोर्ड’  म्हणजे रायटर

नागपूर - पोलिस आयुक्‍त शहर पोलिस दलाला अपडेट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी अंतर्गत बदल्यांचा मोठा उलटफेर करण्यात आला. मात्र, नव्या ठिकाणी जाणाऱ्या ठाणेदारांना नव्या परिसराचा अभ्यास करून कर्तव्य बजवावे लागणार आहे. तरी तेथे वर्षानुवर्षे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे रायटर (लेखनिक) साहेबांना कुठे काय करायचे? याची संपूर्ण माहिती देणार आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्‍तांच्या उद्देशाला हरताळ फासला जाण्याची शक्‍यता आहे.

शहर पोलिस दलाला नवी झळाळी देण्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी ‘एन कॉप’ प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. त्याचा उपयोगही विभागाला होत आहे. पोलिस दलात बदल महत्त्वाचा असल्याने ठाणेदारांच्या अंतर्गत बदल्यासुद्धा नुकत्याच करण्यात आल्या. मात्र, बदल्यांसह आंतरिक सिस्टिममध्ये बदल होणे गरजेचे आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक बदलल्यानंतर सर्वप्रथम ‘खास माणूस’ म्हणून पीआय रायटरला ओळखले जाते. पोलिस ठाण्यातील ‘मदरबोर्ड’ म्हणून पीआय रायटरचे स्थान असते. नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षकाला ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्डे, वरली-मटका, दारूविक्री, अंमली पदार्थविक्री आणि सट्टेबाजी इत्यादींची माहिती रायटर देत असतो. यासोबतच कुठून काय मिळते? आणि कसे मिळते? याबाबतही नव्याने आलेल्या अधिकाऱ्याला माहिती रायटर देतो. एका पीआयला एक अधिकृत तर २ ते ३ अनधिकृत रायटर असतात. अन्य दोन रायटर हे ‘वसुली पथक नियंत्रक’ म्हणून काम करीत असतात. त्यामुळे पुणे-मुंबई येथूनही बदलून आलेल्या पोलिस निरीक्षकासाठी ‘सेटिंग’ करण्याची कामे रायटर करतात. जोपर्यंत वर्षानुवर्षे असलेले रायटर बदलणार नाहीत, तोपर्यंत ठाण्यात बदल घडणार नाही, अशी चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com