पोलिसांनाच ओढावे लागले स्ट्रेचर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात मध्यवर्ती कारागृहातून प्रकृती गंभीर असलेल्या कैद्याला आणले. परंतु, स्ट्रेचर कुलूप बंद होते. अटेन्डंट्‌स नसल्याने कैद्याला स्ट्रेचरवरून तपासणीसाठी नेण्यापर्यंतचे सर्व काम खाकी वर्दीतील पोलिसांनाच करावी लागली.

मेडिकलमध्ये अटेन्डंट्‌सचा गेल्या दशकापासून तुटवडा आहे. रुग्णांची ने-आण करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईकच स्ट्रेचर ओढतात. ही बाब साऱ्यांनाच ठाऊक आहे. कारागृहातून प्रकृती गंभीर असलेल्या कैद्याला आणण्यात आले. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात एक अटेन्डंट होता.

त्याला आवाज दिला. परंतु तो आला नाही. खाकी वर्दीचा धाक सामान्य माणसाला आहे. परंतु मेडिकलमध्ये कार्यरत एका अटेन्डंट्‌सला खाकी वर्दीचा धाक नसल्याचे यावरून दिसून येते.  

भरतीसाठी शासन उदासीन 
मेडिकलमध्ये ८२२ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यात सफाई कर्मचाऱ्यांची तीनशेवर पदे आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची सर्वच पदे भरण्यात आलीत. परंतु अटेन्डंट्‌सची पदे भरण्याबाबत शासन उदासीन आहे. ३१२ अटेन्डंट्‌सची पदे रिक्त असल्यामुळे स्ट्रेचर ओढण्यासाठी अटेन्डट मिळत नाहीत. बाह्यरुग्ण विभागात सकाळी ९ ते २ या वेळात प्रचंड गर्दी असते. अडीच हजारांवर रुग्णांची नोंद होते. यामुळे बाह्यरुग्ण विभागाच्या प्रवेशद्वारावर ३ अटेन्डंट्‌सची गरज आहे. परंतु एकाच अटेन्डटच्या भरवशावर येथे काम सुरू असते. त्यामुळेच हा अटेन्डंट खाकी वर्दीवाला असो की डॉक्‍टर कोणाचेही तो ऐकून घेत नाही. अटेन्डंट्‌स उपलब्ध नसताना परिचारिकांना स्ट्रेचर ओढत नेण्याचा अनुभव दर दोन दिवसांनी येत असल्याचे दृश्‍य नेहमीच दिसते. 

वरिष्ठ डॉक्‍टर दिसत नाहीत 
महिन्याला दीड लाख रुपये वेतन येथील वरिष्ठ डॉक्‍टर घेतात. परंतु, दर मंगळवारी आणि शनिवारी मेडिसीन आणि सर्जरी विभागात प्रचंड गर्दी असताना येथे वरिष्ठ डॉक्‍टरांकडून सेवा दिली जात नाही. केवळ जेआर १, जेआर २ आणि जेआर ३ या निवासी डॉक्‍टरांच्या भरवशावर सेवा सुरू असते. सोमवारी सर्जरी विभागात विभागप्रमुखासह वरिष्ठ डॉक्‍टर उपलब्ध असतात. त्यामुळे या दिवशी मात्र येथे प्रचंड गर्दी दिसते.

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये ही अतितातडीची सेवा देणारे विभाग आहेत. यामुळे येथे डॉक्‍टर व परिचारिकांची पदे भरण्यासाठी शासन प्रचंड उत्साही दिसते. ही पदे त्वरीत भरण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. 
- त्रिशरण सहारे, इंटक, नागपूर.