रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थांची तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नागपूर - रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शनिवारी स्वच्छ आहारदिन पाळण्यात आला. यानिमित्त रेल्वेस्थानक व रेल्वेगाड्यांमध्ये उपलब्ध पदार्थांची गुणवत्ता, पेंट्रीकारमधील स्वच्छता तपासण्यात आली. 

नागपूर - रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शनिवारी स्वच्छ आहारदिन पाळण्यात आला. यानिमित्त रेल्वेस्थानक व रेल्वेगाड्यांमध्ये उपलब्ध पदार्थांची गुणवत्ता, पेंट्रीकारमधील स्वच्छता तपासण्यात आली. 

रेल्वेतर्फे 31 ऑगस्टपर्यंत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शनिवारी मध्य व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे स्वच्छ आहारदिन पाळण्यात आला. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: विभागातील विविध रेल्वेस्थानकांवरील स्टॉल, जनाहार व रेल्वेगाड्यांमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची तपासणी करून गुणवत्तेचे निरीक्षण केले. प्रवाशांकडून फॉर्म भरून घेत खाद्यपदार्थांबाबत अभिप्राय घेण्यात आला. पदार्थ तयार करण्याचे ठिकाण आणि कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन करण्यात येत असल्याबाबत खात्री करून घेण्यात आली. कर्मचाऱ्यांना कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे अपर विभागीय व्यवस्थापक डी. सी. अहीरवार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांनी स्वत: वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांना भेटी देऊन तिथे उपलब्ध अन्नपदार्थांचे निरीक्षण केले. रेल्वेस्थानकांवर मिळणारा जनाहार, रेस्टॉरेंट, केटरिंग युनिट, मोबाईल केटरिंग युनिट व स्टॉलचेही निरीक्षण करण्यात आले. प्रवाशांशी चर्चा करून त्यांचे अभिप्राय जाणून घेण्यात आले. प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे निर्देश विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी अधिकारी व पर्यवेक्षकांना दिले. 

Web Title: nagpur news railway food