पावसामुळे विदर्भातील बळीराजा सुखावला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नागपूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून नागपूर व विदर्भात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

नागपूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून नागपूर व विदर्भात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

छत्तीसगडमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या मॉन्सून सक्रीय आहे. नागपूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून नियमितपणे पावसाच्या सरी पडताहेत. मंगळवारीदेखील सकाळी दोन-अडीच तास संततधार बरसला. हवामान विभागाने शहरात सकाळी साडेआठपर्यंत 17.4 मिलिमीटर पावसाची नोंद केली. विदर्भात अकोला (66.2 मिलिमीटर), ब्रम्हपुरी (64.4 मिलिमीटर), गोंदिया (33.8 मिलिमीटर), वर्धा (24.6 मिलिमीटर) येथेही दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पावसामुळे खरिप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, धानपट्ट्यालाही फायदा झाला आहे. शिवाय तलाव व धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.