गृहराज्यमंत्री पाटील यांच्या कन्येला न्यायालयाची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

नागपूर - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कन्येनंतर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या कन्या जाई ऊर्फ कश्‍मिरा वादात सापडल्या आहेत. रणजित पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कन्येच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती दडविल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जाई ऊर्फ कश्‍मिरा पाटील यांना नोटीस बजावली आहे. 

राजकुमार बडोले यांच्या कन्येला परदेशात शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल वाद निर्माण झाला होता. अमरावती पदवीधर मतदारसंघातून रणजित पाटील यांची विधान परिषदेवर निवड झाली आहे. या वेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कन्येच्या नावावर असलेल्या संपत्तीचा उल्लेख केलेला नसल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. 

विक्रांत काटे यांनी ही याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने येत्या दोन आठवड्यांत या संदर्भात उत्तर सादर करण्याचे निर्देश कश्‍मिरा पाटील यांना दिले आहेत. विक्रांत काटे यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली असून यात कश्‍मिरा पाटील यांच्या नावे संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. रणजित पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कन्येच्या नावापुढे संपत्ती म्हणून "निरंक' दर्शविले आहे.