घोटाळा साडेचार कोटींचा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नागपूर - नागपुरातील किंग्जवे रोडवर असलेल्या ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सच्या माजी शाखा व्यवस्थापक आणि एका दाम्पत्याला साडेचार कोटींच्या बॅंक कर्ज घोटाळा प्रकरणात सीबीआयने अटक केली. जगतसिंह बिश्‍ट, कविता नरहरशेट्टीवार आणि पती सतीश विलासराव नरहरशेट्टीवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

नागपूर - नागपुरातील किंग्जवे रोडवर असलेल्या ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सच्या माजी शाखा व्यवस्थापक आणि एका दाम्पत्याला साडेचार कोटींच्या बॅंक कर्ज घोटाळा प्रकरणात सीबीआयने अटक केली. जगतसिंह बिश्‍ट, कविता नरहरशेट्टीवार आणि पती सतीश विलासराव नरहरशेट्टीवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा येथे राहणारे सतीश आणि कविता नरहरशेट्टीवार दाम्पत्याची मातोश्री कन्स्ट्रक्‍शन कंपनी आहे. या दाम्पत्याने भूखंड आणि घर जुलै २०१३ पासून नागपुरातील ओरीएंटल बॅंकेसह अन्य बॅंकेत गहाण ठेवण्याचा सपाटा सुरू केला. बनावट कागदपत्रांद्वारे संपत्ती किंग्जवेच्या ओरीएंटल बॅंकेत गहाण ठेवण्यात आली. त्यासाठी वेळोवेळी साडेचार कोटी रुपयांचे कर्ज नरहरशेट्टीवार दाम्पत्यांनी उचलले. 

२५ सप्टेंबर २०१३ मध्ये कविताने मातोश्री कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या नावाने काही प्रॉपर्टी गहाण ठेवली. २०१५ मध्ये कविताने बॅंकेकडे कर्जाची उचल घेण्याची मर्यादा वाढविण्यासाठी अर्ज केला. बिश्‍ट यांनी तो अर्ज लगेच मंजूर केला.  वर्धा जिल्ह्यातील इंझापूर आणि नालवाडी येथील घर बॅंकेकडे गहाण ठेवण्यात आले होते. बॅंकेचे साडेचार कोटींचे कर्ज परत करण्यासाठी बॅंकेने कविता आणि सतीशला नोटीस पाठवली. मात्र, ते कर्ज फेडण्यास सक्षम नसल्यामुळे बॅंकेने त्यांच्या घर आणि भूखंड ताब्यात घेतला. या प्रकरणी ओरीएंटल बॅंकेचे अधिकारी रणबीरसिंह सहरावत यांच्या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

‘डबल गेम’
कविता आणि सतीशने ओरिएंटल बॅंकेत गहाण ठेवलेली प्रॉपर्टी ऑक्‍टोबर २०१२ मध्येच  तिरुपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेत गहाण ठेवली होती. तीच प्रॉपर्टी नागपुरातील ओरिएंटल बॅंकेतही गहाण ठेवून साडेचार कोटींचे कर्ज उचलले होते. कविता आणि सतीशने अशा प्रकारे दोन्ही बॅंकांशी ‘डबल गेम’ खेळून फसवणूक केली.

Web Title: nagpur news Scam Rs 4.5 crores