फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यूला कृषी मंत्रालय जबाबदार: पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे.  आमच्या काळात फवारणी दरम्यान एकही शेतकऱ्याच्या मृत्यु झाला नाही. हे संबंधित मंत्रालयाचे अपयश आहे.

नागपूर - आमच्या काळात शेतात फवारणी दरम्यान एकही शेतकऱ्याचा मृत्यु झाला नाही, हे संबंधित कृषी मंत्रालयाचे अपयश आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शरद पवार हे आज (सोमवार) नागपूर दौऱ्यावर असून, यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी भाष्य केले. तसेच त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही सरकारला लक्ष्य केले. 

शरद पवार म्हणाले, की परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे.  आमच्या काळात फवारणी दरम्यान एकही शेतकऱ्याच्या मृत्यु झाला नाही. हे संबंधित मंत्रालयाचे अपयश आहे. विना परवाना अप्रमाणित कीटकनाशक बाजारात आल्याने हे बळी गेले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीत नाव नाही त्यांना कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफी नियोजनाशिवाय झाली आहे. सरकारला आणखी 10 ते 15 दिवस वेळ देऊन पुढील निर्णय घेऊ. मी सरकारला वेळ द्यायला तयार आहे. उद्धव आणि राज यांच्यावर बोलायचे नाही, तो माझा विषय नाही.