महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर

महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर

नागपूर - पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरच्या दरात केंद्र सराकराने केलेल्या दरवाढीविरोधात शिवसैनिकांनी बंडी चालवून आंदोलन केले. कॉटन मार्केट चौकात महागाईच्या पुतळ्याचे दहन करून केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने केली.

केंद्र शासनाने शंभर दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. यानंतरही ती कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे दर ८१ रुपये झाले आहेत. सिलिंडरच्या सबसिडी दरात कपात केली जात असल्याने गोरगरीब, मध्यमवर्गीय जनता चांगलीच संतापली आहे. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांनी केले. 

आंदोलनात सूरज गोजे, किशोर कुमेरिया, मंगला गवरे, चंद्रहास राऊत, डॉ. रामचरण दुबे, नितीन तिवारी, गुड्डू रहांगडाले, चिंटू महाराज, किशोर पराते, दीपक शेंद्रे, ओंकार पारवे, शरद सरोदे, बाल्या मगरे, गुलाब भोयर, नीलेश तिघरे, प्रीतम कापसे, शशीधर तिवारी, धगन सोनवने, अंकिता शाहू, अमोल निंबाळकर, सुरेश टाले, कृष्णा चौवाके, शुभम फुंडकर, विजय शाहू, आशीष लारोकर, दिगांबर ठाकरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. राज्यात व केंद्रातील सत्तेत सहभागी असतानाही आंदोलन केल्याने शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com