कलावंतांना प्रदेशाचे बंधन नसते - स्पृहा जोशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नागपूर - मालिका, नाटक किंवा चित्रपटांमध्ये हा या प्रदेशाचा, तो त्या प्रदेशाचा, असा विचार करून कलावंतांना काम मिळत नाही. कलावंत हा कलावंतच असतो. त्याला प्रदेशाचे बंधन नसते, असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी हिने आज (सोमवार) येथे व्यक्त केले. 

एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपुरात आली असताना ती बोलत होती. यावेळी तिच्यासोबत अभिनेता गष्मीर महाजनीदेखील उपस्थित होता. ‘प्रादेशिक संदर्भ एखाद्या चित्रपटात येतात, तेव्हा त्यामागे वेगवेगळे फ्लेवर समाविष्ट करण्याची भूमिका असते. आमच्याही चित्रपटात कोकण आणि नागपूरच्या कुटुंबांमधील चित्र उभे करण्यात आले आहे. 

पण, कलावंतांची निवड करताना प्रदेश किंवा भाषा बघून केली जात नाही. त्यासाठी उपलब्धता, भूमिकेची गरज यांसारखे निकष लावले जातात. एखाद्या प्रदेशातील किंवा विशिष्ट्य भाषेतील कलावंताला डावलायचे म्हणून कुठलेही धोरण नसते,’ असेही ती म्हणाली.