मामाने दिला मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नागपूर - तीन वर्षांपूर्वी वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. घरातील कर्ता पुरुषच अंथरुणाला खिळल्यामुळे कुटुंबावर ताण येणे स्वाभाविक होते. सारे काही सुरळीत सुरू असताना अचानक आलेल्या या संकटसमयी सेजलचे मामा नीलेश पाटील यांनी मदतीचा हात दिला. योग्यवेळी दिलेल्या आधारामुळे सेजल सुरेश मोटघरेने ९१.८० टक्के गुण मिळविले.

अजनीतील माऊंट कार्मेल गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी सेजलने दहावीमध्ये अनेकींना मागे टाकत घवघवीत यश मिळविले. मूळ कोराडी येथील रहिवासी असलेले मोटघरे कुटुंबीय आता सिरसपेठ येथे मामा नीलेश पाटील यांच्या घराजवळच राहतात. वडिलांची शुश्रूषा आणि अभ्यास असा सेजलचा तीन वर्षांपासून प्रवास सुरू आहे. मुख्य म्हणजे केवळ सकाळी एक तास आणि रात्री दोन ते तीन तास अभ्यास करून सेजलने हे यश मिळविले आहे. सेजलचे वडील सुरेश हे प्रॉपर्टी डीलर होते. मात्र, तीन वर्षांपासून ते घरीच आहेत. आई पूनम या गृहिणी आहेत. यामुळे घराचा बोजा मामावर असल्याचे सेजलने सांगितले. भविष्यात आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी सेजल अकरावी विज्ञानमध्ये प्रवेश घेणार आहे.