सोनमच्या वडिलांना अश्रू अनावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नागपूर - कुटुंबच मूकबधिर असताना नियतीने दिलेल्या या आव्हानाचा धैर्याने सामना करीत सोनम देवीकरने दहावीच्या परीक्षेत यश नोंदविले. सोनमने ९०.२० टक्के गुणांसह दिव्यांग प्रवर्गातून पहिली आली. 

नागपूर - कुटुंबच मूकबधिर असताना नियतीने दिलेल्या या आव्हानाचा धैर्याने सामना करीत सोनम देवीकरने दहावीच्या परीक्षेत यश नोंदविले. सोनमने ९०.२० टक्के गुणांसह दिव्यांग प्रवर्गातून पहिली आली. 

सोनम मूळची वर्धेची. बांधकाम मजूर असलेले वडील परशुराम तिन्ही मुलींना शिकविण्यासाठी धडपडत आहेत. तिन्ही मुलींनी शंकरनगरातील मूकबधिर माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतले. सोनम शिक्षणाच्या निमित्ताने गोपाळनगर येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. मुख्य म्हणजे खोलीवर स्वत:च स्वयंपाक आणि इतर कामे करून ती नियमित शाळेत जायची. मूकबधिर मुलांसाठी शिकवणीची व्यवस्था नाही. त्यामुळे शाळेतील अभ्यासावरच ती पूर्णपणे अवलंबून होती. त्याच आधारावर तिने दहावीत ९०.२० टक्के गुण पटकावले. निकाल कळताच वर्गशिक्षिका उत्तरा पटवर्धन यांनी तिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. यावेळी सोनमचे डोळेच सारे काही सांगत होते. वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाल्याचेही तिने हातवाऱ्यांद्वारे सांगितले. प्राचार्य कमल वाघमारे यांनी अभिनंदन केले. तिला पुढे एमसीव्हीसी करून संगणक क्षेत्रात करिअर करायचे आहे.