‘उत्तुंग’ विशेषांकाचे थाटात प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

नागपूर - महाराष्ट्राचे अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीने काढलेल्या ‘उत्तुंग’ या विशेषांकाचे प्रकाशन रविवारी (ता. ३०) सुधीरभाऊंच्या जन्मदिनी थाटात झाले. नामदार मुनगंटीवार यांच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा मांडणाऱ्या तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणाऱ्या या विशेषांकाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. 

विशेषांक प्रकाशन सोहळा महाराष्ट्र आर्य वैश्‍य समाजाचे अध्यक्ष गणेश चक्करवार आणि पडगिलवार ॲग्रो इंडस्‍ट्रीजचे संचालक तुषार पडगिलवार यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी बोलताना गणेश चक्करवार म्हणाले, राजकारण्यांवर टीका-टिप्पणी सातत्याने होत असते. मात्र, त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्याचे प्रसंग क्वचित येत असतात. ही उणीव ‘सकाळ’ने ‘उत्तुंग’ विशेषांकाच्या रूपाने भरून काढली आहे. एक पारदर्शक नेता आणि अजातशत्रू राजकारण्याच्या कार्याचा गौरव करणारा हा विशेषांक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. तुषार पडगिलवार यांनी ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांना शुभेच्छा देत विशेषांकाचे कौतुक केले. विशेषांकामध्ये मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना यांची विशेष मुलाखत असून बालमित्रांनी उलगडलेल्या आठवणींचा संग्रह आहे. याशिवाय मुनगंटीवार यांच्या सामाजिक, राजकीय कार्यांचा प्रवास मांडणारे लेख आहेत. 

यावेळी विदर्भ आवृत्तीचे युनिट हेड संजीव शर्मा यांनी ‘सकाळ’द्वारे सुरू असलेल्या ‘सकाळ रीलिफ फंड’, ‘तनिष्का’  तसेच ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ आदी उपक्रमांची माहिती दिली. कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. आभार तेजस काळमेघ यांनी मानले. मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) सुधीर तापस तसेच जाहिरात आणि संपादकीय विभागातील सहकारी उपस्थित होते.

Web Title: nagpur news Sudhir Mungantiwar