स्वाइन फ्लूच्या बळींचा आकडा ३९

स्वाइन फ्लूच्या बळींचा आकडा ३९

नागपूर - तापमानात बदल होताच शहराभोवती स्वाइन फ्लूचे संकट पुन्हा गहिरे झाले आहे. जानेवारीपासून चालू वर्षात या आजाराने आतापर्यंत नागपूर विभागात ३८ जणांचे प्राण घेतले. त्यात पुन्हा एका महिलेच्या मृत्यूची भर पडली. स्वाइन फ्लू मृतांची संख्या ३९ झाली आहे. पंचेचाळिशीतील ही महिला शहरातील जम्बुद्वीपनगरातील आहे. विशेष असे की, सर्वाधिक मृत्यू हे एकट्या नागपूर शहर आणि ग्रामीण भागात नोंदविले गेले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूने दगावलेल्यांमध्ये नागपूर जिल्हा विभागात आघाडीवर आहे. त्यापैकी १२ रुग्ण मध्य प्रदेशातून नागपुरात रेफर करण्यात आले होते. विभागात स्वाइनची लक्षणे आढळल्याने आतापर्यंत १५२ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती. यातील ३९ जणांनी जीव गमावला आहे. आतापर्यंत सुमारे सहाशेवर व्यक्तींच्या घशातील द्रवाच्या नमुन्यातील चाचण्या करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातही प्रत्येकी एक मृत्यूची नोंद आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयाने घेतली आहे.

अकोला विभागातही २४ मृत्यू 
स्वाइन फ्लूचा प्रकोप पश्‍चिम विदर्भातही आहे. अकोला विभागातही स्वाइन फ्लूने २४ जण दगावल्याची नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com