वाघांच्या मृत्यू प्रकरणी वनपाल निलंबित

वाघांच्या मृत्यू प्रकरणी वनपाल निलंबित

नागपूर/रामटेक - पवनी वनपरिक्षेत्रामधील हिरवा उपवनक्षेत्रामध्ये वाघ आणि वाघिणीचा मृत्यू, पशुधन हानी प्रकरणाचा निपटारा करण्यास वनपाल एस. टी. उईके यांनी टाळाटाळ  केल्यानेच झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे उपवनसंरक्षकांनी तातडीने त्याच्या निलंबनाचे आदेश दिलेत.

पवनी वनपरिक्षेत्रातील टांगला उपवनक्षेत्रामध्ये पिंडकेपार येथील रहिवासी आनंदराव मडावी याच्या एका गायीची वाघांनी शिकार केली. त्याची नोंद वनपाल उईके यांच्याकडे केली. परंतु, वनपाल नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करीत होता. त्याबदल्यात एक हजारांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्यासाठी मडावीकडे पैसेच नव्हते. त्यानंतर पुन्हा वाघाने म्हशीवर हल्ला करून जखमी केले. 

त्यामुळे तो खचला. खिशात दमडी नसलेला मडावी कोठून आणणार लाच. नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यानंतर पुन्हा तिसरे पाळीव प्राणी वाघाने मारले. मदतीसाठी वनपालाकडे विनवणी केली. हातपाय जोडले. परंतु, वनखात्यातील अधिकाऱ्यांनी माणुसकी दाखवली नाही. यामुळेच चिडून गायीच्या मृतदेहावरच विष टाकले, अशी कबुली त्याने दिल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले. त्यावृत्ताची वन खात्याने गंभीर दखल घेतली. वनसंरक्षकांनी तातडीने रामटेक येथील सहाय्यक वनसंरक्षकांकडे याबद्दल विचारणा केली. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पशुधन हानी प्रकरणाचा तातडीने निपटारा न केल्याची कबुली मडावी यांनी दिल्याचे त्यांनी उपवनसंरक्षकांनी दिली. उइकेच्या निवासस्थानी पशुधन हानी न दिलेल्या १६ प्रकरणांची कागदपत्रेही  आढळल्याचेही सांगितले. याउपवनसंरक्षकांनी तातडीने मडावीला निलंबित करण्याचे आदेश काढले. या प्रकरणात मडावी हा गुन्हेगार असला तरी खरा गुन्हेगार वनपालच असल्याची चर्चाही वनविभागात होती. या प्रकरणामुळे वन्यप्राण्यांमुळे होणारी भरपाई तातडीने देण्याचे आदेशही  क्षेत्रीय अधिकाऱ्यांना उपवनसंरक्षक आणि मुख्य वनसंरक्षकांनी दिले आहेत. निलंबित केलेल्या उईकेला कोंढाळी मुख्यालयी राहावे, असे आदेशात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com