वाहतूक पोलिसांची नो पार्किंगमध्येच ‘पार्किंग’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नागपूर - शहर वाहतूक दलाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून, दोसरभवन चेम्बर तीनच्या पोलिस अधिकाऱ्यांनी नो पार्किंगमध्ये जप्त केलेली वाहने पुन्हा रस्त्यावर ठेवून वाहतूकीस स्वतःहून खोळंबा निर्माण केला. या प्रकारावरून ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान...’ अशी स्थिती झाली. 

नागपूर - शहर वाहतूक दलाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून, दोसरभवन चेम्बर तीनच्या पोलिस अधिकाऱ्यांनी नो पार्किंगमध्ये जप्त केलेली वाहने पुन्हा रस्त्यावर ठेवून वाहतूकीस स्वतःहून खोळंबा निर्माण केला. या प्रकारावरून ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान...’ अशी स्थिती झाली. 

शहर वाहतूक पोलिस दलाचे नेतृत्व बदलल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था थोडीफार व्यवस्थित होईल, अशी आशा असतानाच चक्‍क पोलिस कर्मचारीच वाहतूक नियमांना खो देत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. वाहतूक शाखेच्या चेम्बर तीनचा कारभार वाऱ्यावर असून, चक्‍क रस्त्यावर त्यांनी वाहने उभी केली आहेत. वाहतूक तीनचे पोलिस निरीक्षक अशोक बागुल यांनी चेम्बर तीनच्या परिसरतील ‘नो पार्किंग’मध्ये आणि रस्त्यावरील वाहने उचलून आणण्याचा सपाटा सुरू केला. वरवर पाहता ही सकारात्मक बाजू आहे. मात्र, उचलून आणलेल्या दुचाकी वाहतूक शाखेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ठेवण्यात आल्यात. या वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. चेम्बर कार्यालयासमोरील रस्त्यावर अस्ताव्यस्त असलेल्या वाहनांमुळे मोठा अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मात्र, परिसरातील रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलण्यात हातखंडा असलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतःच रस्त्यावर जप्त वाहने उभी करून नवा आदर्श ठेवला आहे. अवैध वाहतूकीवर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान चेम्बर तीनच्या पोलिस अधिकाऱ्यांवर आहे. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांचे अवैध वाहतूकदारांशी असलेले साटेलोटे वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवे आव्हान असल्याची चर्चा आहे. 

बसस्थानकावरही कब्जा
दोसरभवन समोरील चेम्बर तीन कार्यालयासमोर सीटी बसच्या प्रवाशांसाठी थांबा देण्यात आला आहे. बसस्थानकाच्या शेडमध्येसुद्धा वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी आणि अन्य वाहने ठेवली आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात बसायला जागा उरली नाही तसेच बसलाही मीटरभर अंतरावर जाऊन उभे राहावे लागते. या बाबीकडे मनपा आयुक्‍तांसह पोलिस आयुक्‍तांचेही दुर्लक्ष आहे.

टॅग्स