दोनशेची नोट पोहोचली नागपुरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

नागपूर - भारतीय रिझर्व्ह बॅंकेने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चलनात आणलेली २०० रुपयांच्या नोटा नागपुरातील अनेक बॅंकांमध्ये आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ही नोट मेट्रो  शहरात आणल्यानंतर एक सप्टेंबरला येथील रिझर्व्ह बॅंकेत आली. सलग दोन दिवस  शनिवार आणि रविवारची सुटी असल्याने सोमवारपासून बॅंकांना रात्री उशिरापर्यंत २०० नोटांचे वाटप करण्यात आले. प्रथमच चलनात येणार असल्याने नागरिकांमध्ये नोटेबद्दल उत्सुकता आहे.  

दिल्ली, मुंबईसह काही शहरांत २०० च्या नोटचे वाटप करण्यात आले. या नोटेसाठी अनेकांनी रांगाही लावल्या. आता विदर्भातील सर्वच शहरांमध्ये या नोटा पोहोचल्या. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये सोमवारी रात्री उशिरा या नोटा मिळाल्या. त्याचे वाटप अद्याप सुरू झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

५०० आणि दोन हजारांच्या नव्या नोटा चलनात आल्या त्यावेळी एटीएम मशीनमध्ये बदल करावे लागले होते. आता २०० च्या नोटेसाठी एटीएम यंत्रणेत फेरबदल करावे लागणार आहेत. 

केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि एक हजारांच्या नोटा चलनातून बाद  केल्या होत्या. त्यानंतर सरकारने लगेच दोन हजारांची नोट चलनात आणली. लगेच पाचशेची नोटही चलनात आणली. नागपूरच्या रिझर्व्ह बॅंकेत ३१ ऑगस्ट रोजी ५० रुपयांच्या नवीन नोटा आल्या होत्या. त्यापाठोपाठ दोनच दिवसांनी पुन्हा २०० रुपयांच्या नवीन नोटा रिझर्व्ह बॅंकेत आल्या.