...अन्‌ अर्ध्यावरच तुटली ‘दोस्ती’

बुधवार, 12 जुलै 2017

नागपूर - आमचा दहा जणांचा ग्रुप... जिवलग मित्र म्हणून सुपरिचित... कुठेही जायचे असले तरी सोबतच... पंक्‍या तेथे अजय असे कॉम्बिनेशन. आमची ‘जय-वीरू’ म्हणून ओळख निर्माण झाली. दोघेही २० वर्षांपासून सोबत... सोबत शिकलो व मोठे झालो. नोकरीही एकाच शाळेत करायची ठरवले. वेणा जलाशयावर जलविहार करण्याचा माझाही प्लान होता. तयारी झाली आणि निघणार तोच पत्नी परिणीतीचा हट्ट नडला.

नागपूर - आमचा दहा जणांचा ग्रुप... जिवलग मित्र म्हणून सुपरिचित... कुठेही जायचे असले तरी सोबतच... पंक्‍या तेथे अजय असे कॉम्बिनेशन. आमची ‘जय-वीरू’ म्हणून ओळख निर्माण झाली. दोघेही २० वर्षांपासून सोबत... सोबत शिकलो व मोठे झालो. नोकरीही एकाच शाळेत करायची ठरवले. वेणा जलाशयावर जलविहार करण्याचा माझाही प्लान होता. तयारी झाली आणि निघणार तोच पत्नी परिणीतीचा हट्ट नडला.

वेळेवर पत्नी रुसल्यामुळे आनंदावर विरजण पडले. मन मारून मी घरी थांबलो. ‘आता हे माझे सुदैव की दुर्दैव?’ हे मलाच कळत नाहीये, अशी प्रतिक्रिया  ‘अबे पंक्‍या पगल्या तुने मिस किया बे’ अशा डॉयलॉगने प्रकाश झोतात आलेल्या पंकज नेरकर यांनी अतिशय हळव्या शब्दात ‘सकाळ’शी बोलताना दिली.

एमएससी बीएड असलेले पंकज नेरकर हे जामठ्यातील माउंट फोर्ट शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. त्याच शाळेत अजय भोयर हेसुद्धा शिक्षक होते. अमोल, रोशन, पंकज, राहुल, परेश आणि प्रतीक हे त्यांचे जीवलग मित्र. सर्वच मित्र उच्चशिक्षित असून, चांगल्या नोकरीवर आहेत. एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी साथ-देणारे आणि वेळ पडल्यास एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकणारे हे सर्व मित्र. वेणा जलाशावर मस्ती करण्याचा प्लान पाच दिवसांपूर्वीच झाला होता. सर्वांनी सुटी आणि घरातून परवानगीसुद्धा घेतली होती. काहींनी लगेच येतो, अशी थाप मारून वेळ मारून नेली होती. रविवार असल्यामुळे सकाळपासूनच काय करायचे? खायला काय घ्यायचे? परत कधी यायचे? सर्व ठरले होते. ऐन वेळेवर पंकज पत्नीच्या आग्रहाखातर घरी थांबला.

गुरुपौर्णिमेनिमित्त पत्नी परिणीती हिने घरी पूजेचा कार्यक्रम ठेवला होता. पंकज येत नसल्यामुळे अजयची जाण्याची इच्छा नव्हती. मात्र, इतर मित्रांनी प्लानिंग न बदलता जाण्याचा निर्णय घेतला आणि तेथेच घात झाला. रोशन व अमोल सोडून सर्वांना प्राण गमवावा लागला. हे दुःख आणि सल आयुष्यभर बोचत राहील, अशी प्रतिक्रिया शिक्षक असलेल्या पंकज याने दिली.

मित्र सोबतच असते...
मला पोहणे येते. त्यामुळे बोट बुडाल्यानंतर मित्रांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता. एकेकाला पाण्याबाहेर काढले असते. पोहून बाहेर न येता सर्वांना घेऊन बाहेर आलो असतो. मृत्यूशी दोन-दोन हात करून मित्रांसाठी यमराजाशी लढलो असतो. मी खरंच ‘पगला’ आहो, जर गेलो असतो, तर आठही मित्र आज माझ्या सोबत असते.
-पंकज नेरकर, मित्र

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

04.06 PM

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

04.06 PM

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

04.06 PM