पावसाळ्यात खोदणार वाढीव बोअरवेल?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नागपूर - जिल्ह्यातील गावांमध्ये बोअरवेलची गरज आहे, पण त्या गावांचा यादीत समावेश नाही. अशा गावांची वेगळी यादी तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर  यांनी बुधवारी (ता. ७) दिले. त्यामुळे यादी केव्हा तयार होणार, निविदा केव्हा काढणार व पावसाळ्यात बोअरवेल खोदणार का? असे विविध प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. 

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा आज अध्यक्ष निशा सावरकर यांच्या  अध्यक्षतेखाली पार पडली. सभेदरम्यान अध्यक्ष सावरकर यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ज्या गावांमध्ये बोअरवेलची गरज आहे. पण, त्या गावांचा यादीत समावेश नाही, त्या गावात बोअरवेल खोदण्यासाठी नव्याने यादी तयार करण्याचे निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले. आधीच पाणीटंचाई निवारणाच्या कामाचे योग्य नियोजन केले असते तर ४० गावांना ६३ टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नसती. आता गावांची यादी तयार करणे म्हणजे तहान लागल्यावर विहिरी खोदण्याचा प्रकार असल्याची चर्चा सभेनंतर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती. बोअरवेल खोदकामाची नियोजित अर्धी कामे शिल्लक आहेत. ३० जूनपर्यंत ही कामे पूर्ण करायची आहेत. नवीन कामे पावसाळ्यात करणार का? असा

प्रश्‍नदेखील उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे झाली नाहीत त्या गावांमध्ये तलावातील गाळ काढण्याची व दुरुस्तीची कामे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

ही कामे करण्यासाठी महात्मा फुले महामंडळाकडून निधी मागणीचा प्रस्ताव त्वरित तयार करून पाठविण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. सभेला उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिक्षण  सभापती उकेश चव्हाण, कृषी सभापती आशा गायकवाड, महिला बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे, सदस्य मनोज तितरमारे, जयप्रकाश वर्मा, प्रणिता कडू, छाया ढोले उपस्थित होते.