फसवणुकीप्रकरणी सीबीआयचा छापा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

नागपूर -  युनायटेड बॅंक ऑफ इंडियाच्या कोलकाता शाखेतून कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने नागपूरसह देशातील १० शहरांत छापे मारले. नागपुरातील व्यावसायिक आयुष लोहिया यांचा समावेश असल्याची माहिती आहे. कोलकाता येथील रामसरूप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी युनायटेड बॅंकेतून १८४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्या कर्जासाठी बनावट कागदपत्रे वापरणे आणि कर्ज न भरल्याप्रकरणी कंपनीला बॅंकेने नोटीस दिली होती. या प्रकरणाची तक्रार बॅंकेच्या वतीने सीबीआयकडे करण्यात आली होती. या प्रकरणी सोमवारी रामसरूप इंडस्ट्रीजविरुद्ध सीबीआयने गुन्हे दाखल केले होते.

या कंपनीचे संचालक नागपुरातील आयुष लोहिया यांच्या कार्यालयावर आणि घरावर सीबीआयने सर्च केला. त्यांच्या कार्यालयातून काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सीबीआयने जप्त केल्याची माहिती आहे. कोलकाता, नागपूर, गुडगाव, जमशेदपूर या शहरातही सीबीआयने छापे घातले. नवीन गुप्ता, आयुष लोहिया, ललित मोहन चॅटर्जी आणि बिमल के. झुनझुनवाला यांच्याही कार्यालयात सीबीआयने छापे मारल्याची माहिती सीबीआयने दिली.

टॅग्स