आमदार राजू तोडसामविरोधात विदर्भातील कंत्राटदारांचा संताप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

धरणे, आंदोलनात केला निषेध; कंत्राटदार शर्माने केली आमदारावर कारवाईची मागणी

नागपूर: यवतमाळ येथील कंत्राटदार शिवदत्त लखवीचंद शर्मा यांना पैशाची मागणी करणारे भाजप आमदार राजू तोडसामविरोधात संताप व्यक्त करीत विदर्भातील कंत्राटदारांनी आज (शुक्रवार) एकत्र येऊन जाहीर निषेध केला. आमदार तोडसाम यांच्यावर तसेच त्यांच्यासारखे वागणारे आणखीही आमदार असून त्यांच्यावर शासन तसेच भाजपनेही कारवाई करावी, अशी मागणी यावेळी शर्मा यांनी केली.

जीएसटीसह अनेक मुद्‌द्‌यांवर सरकारविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या विदर्भस्तरीय कंत्राटदारांनी संविधान चौकात आज धरणे आंदोलन केले. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, गडचिरोली, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिका आदी विभागातील कंत्राटदार आज धरणे आंदोलनासाठी नागपुरात आले होते. मात्र, काल आमदार राजू तोडसाम यांच्यासोबत पैशाच्या मागणीवरून झालेल्या संवादाची 'ऑडिओ क्‍लिप' जाहीर करून चर्चेत आलेले यवतमाळचे कंत्राटदार शिवदत्त लखवीचंद शर्मा यांच्याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. ते व्यासपीठावर येताच सर्वच कंत्राटदारांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. कंत्राटदार शर्मा यांनी आमदार तोडसाम यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. यावेळी सर्वच कंत्राटदारांनी आमदार तोडसाम यांचा जाहीर निषेध नोंदविला. यानंतर कंत्राटदार शर्मा यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना आपबिती सांगितली. आमदार तोडसामच नव्हे जिल्ह्यातील सर्वच आमदारांचा कंत्राटदारांना टक्केवारीचा त्रास असल्याचे त्यांनी नमुद केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'

इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक

ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा

फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा

श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे

उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन

बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात

तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य

हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ

कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’