फू बाई फू... असा कसा देत नाही विदर्भ तू..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नागपूर - स्वतंत्र विदर्भासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यासमोर जाऊन आंदोलन करणाऱ्या विदर्भवाद्यांना पोलिसांनी चितार ओळीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळच रोखण्यात आले. यामुळे येथेच तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘फू बाई फू’च्या चालीवर भजने सादर करून भाजपच्या नेत्यांवर टीका करण्यात आली.

भाजप नेत्यांनी केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्य केले जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र सरकारला तीन वर्षे झाली असून भाजपने नेते आपल्याच आश्‍वासनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. 

वैदर्भींची फसवणूक केल्याने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ‘भाजप सरकार चले जाव’ आंदोलन करण्यात आले. इतवारी शहीद चौकातील विदर्भचंडिकेची दुपारी दोनच्या सुमारास महाआरती केल्यानंतर मोर्चाने टाळ, मृदंगाच्या तालावर सरकारविरोधी, वेगळ्या विदर्भाची घोषणा देत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा रवाना झाला. यात संपूर्ण विदर्भातून शेकडो लोग सहभागी झाले. परंपरागत बंजारा महिला, टाळ, मृदंगासह भजनमंडळी या आंदोलनाचे आकर्षण होते. ‘फू बाई फू फुगडी फू ... गडकरीचा फू..., सरकारचा फू... असा कसा देत नाही’ अशी भजने सादर करणाऱ्या मोर्चाला चितारओळीतच रोखण्यात आले.

माजी आमदार ॲड. वामनराव चटप, राम नेवले, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीर चक्रवर्ती, धनंजय धार्मिक, अरुण केदार, प्रभाकर कोंडबत्तुनवार, राजकुमार नागुलवार, ॲड. संदेश सिंगलकर आदींसह विदर्भातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी, वेगळ्या विदर्भाची शपथही घेण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी तीन तास येथेच ठिय्या मांडला. मात्र त्यांचे निवेदन स्वीकारण्यास कुणीही आले नाही.  यापुढील काळात विदर्भाचे आंदोलन सर्वच खासदारांच्या घरापुढे ठिय्या देण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी हिवाळी अधिवेशन विदर्भाचेच व्हावे, अशी मागणी करण्यात त्यांच्याकडून करण्यात आली.