सत्यवानासाठी झिजणारी आधुनिक सावित्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नागपूर - एखादी व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, हे कळताच त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मित्रमंडळीच काय आप्तजनही दुरावतात. रुग्णाच्या नशिबी एकेटपणा येतो. पण, नागपुरातील ३५ वर्षीय युवकाला त्याच्या पत्नीने साथ दिली. ही आधुनिक सावित्री गेल्या दहा वर्षांपासून स्वत: झिजून सत्यवानाला जगविण्यासाठी खंबीरपणे प्रयत्नरत आहे.

जयताळा येथील नीता (बदलेले नाव) नवरा आणि दोन मुलं आणि पतीसोबत राहते. १६ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतरची पाच वर्षे गुण्यागोविंदाने गेली. एक दिवस मनीषला (बदललेले नाव) ताप आला. आठवडा होऊन ताप कायम असल्याने डॉक्‍टरांनी टेस्ट करायला सांगितल्या. अहवालातून मनीषला एड्‌स झाल्याचे निष्पन्न झाले. दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. घरातील वातावरण बदलून गेले. नीताला तिला काय करावे कळत नव्हते. मुलांना घेऊन माहेरी निघून जाण्याचा विचार केला. परंतु, माहेरी मुलांना घेऊन किती दिवस राहणार? मुलांना वडिलापासून दूर नेण्यात काही अर्थ नाही. या सगळ्यांचा विचार करून नीताने आधी स्वत:ला सावरले.

 नवऱ्याच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा निर्धार केला. परिस्थिती थोडीफार सांभाळत  नाही तर मनीषच्या कामाच्या ठिकाणी आजाराबाबत कळले. नोकरी गेली. पुन्हा पोटाचा प्रश्‍न निर्माण झाला. थोडी फार जमापुंजी होती. त्याच पैशांनी एक ऑटो खरेदी केला. ऑटो चालवायला सुरुवात केली. त्यातही मुलांची शाळा, कौटुंबिक जबाबदारी, औषधे, डॉक्‍टरांची फी हे सगळे एकट्या कमाईत होत नव्हते. म्हणून मुल सकाळी शाळेत गेली की, त्या वेळेत नीताने स्वयंपाकाची कामे करायला सुरुवात केली. 

नीताची ही झुंज फळाला आली. हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला लागल्यात. आजही आपल्या सत्यवानासाठी नियती आणि प्रारब्धाशी आधुनिक सावित्रीचा लढा सुरू आहे. जीवात जीव असेपर्यंत हार मानणार नाही, या निर्धारावर ती ठाम आहे.