पोलिओच्या धर्तीवर हवे रेबीजचे लसीकरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नागपूर - जागतिक आरोग्य संघटनेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात रेबीजमुळे जगभरात दरवर्षी साठ हजारांवर व्यक्ती दगावल्याची नोंद असते. यातील २० ते २१ हजार व्यक्ती भारतातील असतात हे विशेष. रेबीजने झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीत भारत अव्वल नेहमीच असतो. यामुळे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून पोलिओच्या धर्तीवर लसीकरणाची मोहीम सुरू केल्यास रेबीज नियंत्रणात येऊ शकतो. 

जगातील प्रचलित आजारांपैकी एक आजार रेबीज आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर ९५ ते ९७ टक्के जणांना रेबीज होण्याची भीती असते. कुत्रा चावल्यानंतर कुत्र्याच्या लाळेद्वारे हा आजार मानवी रक्तवाहिन्यातून संक्रमित होतो. रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूत शिरतो. यामुळे रेबीज होतो. व्यक्ती मृत्यूच्या दाढेत शिरतो. विशेष असे की, सर्वाधिक मृत्यू हे १५ वर्षे वयोगटाखालील मुलांचे असतात. लस न टोचलेली कुत्री मुलांना चावल्याने हा रोग अधिक वेगाने बळावतो. त्यात ॲन्टी रेबीज लस गरिबांच्या आवाक्‍याबाहेरची असल्याने गरीब लोकांना ती वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही. यामुळे ॲन्टी रेबीज लसीचे धोरण शासनाने ठरवण्याची गरज आहे, असे पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. मृणाल कांबळे यांनी सांगितले.

विषाणूंचा थेट मेंदूवर हल्ला 
देशात प्रत्येक २५ मिनिटांत एक व्यक्ती रेबीजमुळे दगावतो. क्‍लासिकल आणि पॅरासिटिक असे रेबीजचे दोन प्रकार असून ८० टक्के रुग्ण हे क्‍लासिकल रेबीजचे असतात. २०टक्के रुग्ण पॅरासिटिक रेबीजचे आढळून येतात. क्‍लासिकल रेबीज असलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने जखम खाजवणे, पाण्याची भीती वाटणे, पाणी दिसले की रुग्णांच्या गळ्याचे आणि श्‍वासनलिकेचे स्नायू आकुंचन पावतात. विविध भासदेखील होत असून तीन ते चार दिवसांत क्‍लासिकल प्रकारातील रुग्ण दगावतात. पॅरॉसिटिक रुग्णाला पाण्याची भीती वाटत नाही. ताप, डोकेदुखी, पायांमध्ये अशक्‍तपणा येतो. रेबीजचे विषाणू सरळ मेंदूवर हल्ला करतात. पक्षाघात तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्‍यता असल्याचे प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले. 

रेबीज हा आजार वैदिक काळापासून आहे. एका विशिष्ट प्रकारच्या विषाणूमुळे होतो. यावर लुई पाश्‍चर या शास्त्रज्ञाने यावर लस शोधून काढली आहे. परंतु तरीदेखील मृत्यूचे प्रमाण आटोक्‍यात आले नाही.
-डॉ. मृणाल कांबळे,  सहयोगी प्राध्यापक,  पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

Web Title: nagpur news World Rabies Day